Balasaheb Thackeray : बाळासाहेबांनी शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी राज ऐवजी तेव्हा उद्धव ठाकरेंचीच का केली निवड, नेमकं काय ठरलं होतं तेव्हा?

Balasaheb Thackeray and Raj Thackeray, Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी म्हणजे राज ठाकरे, असं सर्वसामान्यपणे समजलं जातं, परंतु....
Balasaheb Thackeray and Raj Thackeray, Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray and Raj Thackeray, Uddhav Thackeray :Sarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thackeray and Shivsena Leadership : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यानंतर शिवसेना पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवली. तेव्हा खरंतर राज ठाकरे या पदासाठी इच्छुक होते. परंतु बाळासाहेबांनी निर्णय जाहीर केला होत. अखेर राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आणि नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वत:चा पक्ष काढला. हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे.

परंतु बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची जबाबदारी सांभाळण्यासाठी राज ऐवजी उद्धव ठाकरेंचीच का निवड केली, नेमकं तेव्हा काय ठरलं होतं? हे आपण जाणून घेऊयात. याबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि बाळासाहेबांसोबत कामाचा अनुभव असणारे हरीश केंची यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मोठी माहिती दिली आहे.

Balasaheb Thackeray and Raj Thackeray, Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray Today Birthday: महाराष्ट्राला मी महान बनवू शकतो!...हे सारं घडलं होतं बाळासाहेब ठाकरे या माणसामुळं!

हरीश केंची म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी म्हणजे राज ठाकरे, असं सर्वसामान्यपणे समजलं जातं. दोघेही बाळासाहेबांच्या हाताखाली लहानाचे मोठे झाले. जसे राज ठाकरे व्यंगचित्र काढतात तसे उद्धव ठाकरेही(Uddhav Thackeray) व्यंगचित्र काढत होते. परंतु नंतर त्यांना फोटोग्राफीमध्ये रस निर्माण झाला तर ते तिकडे गेले. दोघेही जेजे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी होते. दोघेही बाळासाहेबांसोबतच घरात एकत्र राहत होते.'

Balasaheb Thackeray and Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackrey Politics: राज ठाकरेंकडे नाशिक महापालिकेसाठी कोणता मंत्र?

'राज ठाकरे(Raj Thackeray) हे त्यांच्या स्वत:च्या वडिलांकडे राहण्याऐवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मांडीवरच लहानाचे मोठे झाले. शेवटी असं आहे, की दोघांवरही संस्कार झालेलेच आहेत. त्यावेळी अशापद्धतीने एक ठरलेलं होतं की, व्यासपीठावर एकाने गाजवायचं आणि पाठीमागे उद्धव ठाकरेंनी बघायचं अशाप्रकारची रचना 1985पासूनच झालेली होती. हे आधीपासूनच बाळासाहेब ठाकरे यांच्या डोक्यातच होतं.'

'याची राज ठाकरे यांनाही कल्पना आलेली होती. परंतु राज ठाकरे यांच्या महत्त्वकांक्षा वाढलेल्या होत्या. कारण, सभा राज ठाकरे गाजवत होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्यानंतर मीच. कारण लोकही त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची कॉपीच आहेत, असंच म्हणत होते. त्यामुळे त्या वयात त्यांना हे वाटणं स्वाभाविकच होतं, की आता आता मीच सगळं बघायचं.'

परंतु सगळ्यांना सांभाळून घेण्याचा गुण राज ठाकरे यांच्याकडे त्या काळात नव्हता आणि हे गुण उद्धव ठाकरे यांच्यामध्ये त्यावेळी होते. राज ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेवेळी जी काही मंडळी होती, त्यापैकी बाळा नांदगावकर सोडले तर बाकी कोण आहेत त्यांच्यासोबत. कोणीच नाही. जी मंडळी जवळ आली ती सगळी पुन्हा दूर गेली. म्हणजे माणसं सांभाळण्याची कला त्यांच्यात नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com