मोठी घडामोड : परब हल्ल्याचा कट पुण्यात आखला; राणेंना तपासासाठी पुण्याला हलवणार

संतोष परब हल्ला प्रकरणाच कट पुण्यात शिजल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nitesh Rane
Nitesh Rane Sarkarnama

सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणाच कट पुण्यात आखण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे तपासासाठी भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना पुण्याला नेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राणे हे पोलीस कोठडीत असून, त्यांना चौकशीसाठी आता कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणेंना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव सावंतवाडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्यांना तेथून कणकवली पोलीस ठाण्यात आले आहे. तपास अधिकारी सचिन हुंदळेकर हे राणे आणि त्यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब याची समोरासमोर चौकशी करीत आहेत. संतोष परब यांच्यावरी हल्ल्याचा कट पुण्यात शिजल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण या प्रकरणातील सचिन सातपुते याच्यासह चार आरोपी हे पुण्यातील चंदननगर, खराडी भागातील आहेत. यातून या प्रकरणाचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर सामनातून टीका झाल्यानंतर सामनाच्या कार्यालयावर दगडफेक झाल्याप्रकरणी सातपुते हा प्रमुख आरोपी होता. आता परब हल्ला प्रकरणाचा कट पुण्यात शिजल्याचे समोर येत असून, राणेंना तपासासाठी त्यांना पुण्याला नेले जाईल.

नितेश राणेंनी स्वीय सहाय्यक राकेश परबच्या मोबाईलवरून हल्ल्यातील आरोपी सचिन सातपुते याच्याशी मोबाईलवरून संभाषण केले होते. त्यामुळे राकेश परब व नितेश राणे यांची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली होती. त्याला नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई, अॅड. उमेश सावंत यांनी आक्षेप घेतला. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.

Nitesh Rane
मोठी बातमी : गल्वान खोऱ्यात चीनचे नऊपट अधिक सैनिक मारले गेले

काल (ता.2) दुपारी पोलिसांना शरण गेल्यानंतर राणेंना अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. त्यांनी शरण येण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता. (Nitesh Rane News)

Nitesh Rane
आरोप करुन डिसले गुरुजी स्वत:च अडकले; माफीनामा सादर करूनही सुटका नाहीच

मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com