अमित शहांना वादात ओढणं नितेश राणेंना पडलं महागात!

Nitesh Rane | Shivsena : नितेश राणेंना अटक आणि कोठडी
NItesh Rane
NItesh Rane Sarkarnama

सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) काल सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासमोर शरण आले. त्यानंतर त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. न्यायालयाने सध्या त्यांची दोन दिवसांच्या कोठडीत रवानगी केली आहे. नितेश राणेंचे पीए राकेश राणेंच्या मोबाईलवरून हल्ल्यातील संशयीत आरोपी सातपुते याच्याशी नितेश राणेंचे झालेले मोबाईल संभाषण व राकेश परब व नितेश राणे यांची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली.

मात्र या सगळ्या घडामोडींदरम्यान राणे यांनी ट्विट करुन महाविकास आघाडी त्यातही शिवसेनेला काल इशारा दिला होता. यात त्यांनी अमित शहांचा अटक झालेला फोटो ट्विट केला होता. मात्र आता हाच फोटो त्यांना महागात पडल्याची चर्चा आहे. नितेश राणे यांनी हे ट्विट आता डिलीट केले आहे. त्यांना पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरुनच तशा सुचना आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

NItesh Rane
अखेर अनिल परबांचा सल्ला नितेश राणेंना ऐकावा लागला!

नितेश राणे यांनी ट्विट करुन २००९ मध्ये पी. चिदंबरम गृहमंत्री असताना अमित शहा यांना अटक केल्याची घटना सांगितली होती. तर १० वर्षांनंतर अमित शहा गृहमंत्री असताना पी. चिदंबरम यांना अटक केले होते असेही सांगितले होते. त्यासोबत "समय बडा बलवान होता है, इन्सान खामो खा गुरुर करता है" असे कॅप्शन लिहित शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या इशारा दिला होता.

नितेश राणे यांचा यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने राणेंचा जामीन फेटाळला होता. यानंतर राणेंच्या वतीने ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्यात आल्याचे आता मानेशिंदे यांनी सांगितले. यानंतर राणे हे स्थानिक न्यायालयात शरण आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात येवून त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com