Video Ajit Pawar : बारामतीमधून जय पवार निवडणुकीच्या रिंगणात? अजितदादा म्हणाले,...

Ajit Pawar Jay Pawar : जय पवार यांना बारामतीमधून संधी द्यावी, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांमधून होत असल्याचा विषयी प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला.
Ajit Pawar Jay Pawar
Ajit Pawar Jay Pawar sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात चुरसशीची लढत झाली. या निवडणुकीनंतर बारामती विधानसभा निवडणुकीत काय होणार? याची चर्चा होती. जय पवार यांना बारामतीमधून संधी द्यावी, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांमधून होत असल्याचा विषयी प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला.

त्यावर अजित पवार म्हणाले, 'ठीकये. ही शेवटी लोकशाही आहे. पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातील कार्यकर्ते जी मागणी करतील ते आम्ही करायला तयार आहोत.

मी सात ते आठ निवडणुका केल्या आहेत. त्याच्या (जय पवार) संदर्भामध्ये जनतेचा, कार्यकर्त्यांचा तसा कल असेल त्याचा विचार पार्लमेंटरी बोर्डामध्ये केला जाईल, असे म्हणत अजित पवार यांनी जय पवार यांना उमेदवारी देणार की नाही याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेणार असल्याचे स्पष्ट केले.

Ajit Pawar Jay Pawar
Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीत आघाडीकडून उद्धव ठाकरेंवर मोठी जबाबदारी

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काल 25 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. विरोधकांनी काय टीका करावी हा त्यांचा अधिकार आहे. मात्र कष्टकरी वर्गातील महिलांना पैसे मिळत आहे. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना वीजबिल माफ, सिलेंडरमध्ये सूट गरीब घटकाला तसेच सर्वजाती धर्मातील थोड्याश्या मागे राहिलेल्या महिलांना महायुती सरकार मदत करत आहे.' असे अजित पवार म्हणाले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधी वरून वाद झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र, मुख्यमंत्री आणि आमच्यात कुठलाही वाद नाही. आम्ही ऐकोप्याने सरकार चालवतोय, असे अजित पवार यांनी सांगितले.

विकासाचा मुद्दावर निवडणूक

विरोधकांकडे मुद्दे नाहीत. त्यामुळे ते संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र, आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे घेऊन जाणार आहोत. विकासाच्या ज्या योजना राबवल्या त्या लोकांना सांगणार आहोत. आम्ही केलेल्या विकास कामांची माहिती देणार आहोत. आम्ही कामाची माणसं आहोत. विकास करणारी माणसं आहोत, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar Jay Pawar
PM Narendra Modi : भारत, संविधान की शेतकरी..! भाषणाचा विक्रम मोडताना मोदींचा कोणत्या शब्दांवर होता भर? जाणून घ्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com