Ajit Pawar plane crash: संजय गांधी ते अजित पवार; विमान अपघाताने हिरावले महत्त्वाचे नेते!

संजय गांधी ते अजित पवारपर्यंत, विमान अपघातांनी भारतीय राजकारणातील अनेक महत्त्वाचे नेते हिरावले.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : व्यस्ततेमुळे विमान प्रवास राजकीय नेत्यांना अपरिहार्य बनला आहे. विशेषता निवडणुकांच्या प्रचारात विमान वापरणे सामान्य बाब बनली आहे. यातूनच झालेल्या अपघातांनी राजकारणाचे आणि देशाचे मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामती येथे अपघात झाला. विमानाच्या लँडिंग समय तांत्रिक बिघाडाने हा अपघात झाला. यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आहे.

विमान अपघातात आजवर अनेक नेत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वृत्त संस्थेच्या माहितीनुसार 242 पैकी 241 अपघातांमध्ये मृत्यू झालेले आहेत. यात अनेक दिग्गज आणि महत्त्वाच्या नेत्यांना देश मुकला. काँग्रेस पक्षाने आपल्या अनेक दिग्गज नेत्यांना विमान अपघातात गमावले आहे. 23 जून 1980 ला नवी दिल्लीतील सफदरजंग धावपट्टीवर झालेल्या छोट्या विमानाच्या अपघातात काँग्रेस नेते संजय गांधी यांचा मृत्यू झाला होता. हा काँग्रेस पक्षाला बसलेला मोठा आघात होता.

Ajit Pawar
Ajit Pawar Plane Crash: अपघातग्रस्त विमानात मृत्यू झालेल्यांमध्ये अजित पवारांसह कोण होतं? जाणून घ्या

उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे 2001 मध्ये झालेल्या विमान अपघातात काँग्रेस नेते माधवराव सिंधिया यांचे निधन झाले. मैनपुरी येथील भोगाव गावानजीक हा अपघात झाला होता. सिंधिया केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे मध्य प्रदेशचे प्रभावी नेतृत्व होते. आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते वाय एस राजशेखर रेड्डी यांचे 2009 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. बेगमपेट येथून हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र दाट जंगलात ते बेपत्ता झाले. तीन दिवस त्यांचा शोध घेतला जात होता.

अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खाडू यांचा इटानगर ते तवांग या प्रवासात विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता. 2011 मध्ये ही दुर्घटना घडली. त्यांच्या मृत्यूने अरुणाचल प्रदेश सरकारला मोठा धक्का बसला होता. आंध्र प्रदेशचे जीएमसी बाल योगी यांचा 1991 मध्ये विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाने यांचा एअर इंडियाचे विमान कोसळल्याने अलीकडेच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत विमानातील एक प्रवासी वगळता उर्वरित सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

Ajit Pawar
Girish Mahajan : वंचितकडून निषेध..., गिरीश महाजनांच्या राजीनाम्याची मागणी, प्रजासत्ताक दिनाचा वाद पोहोचला जळगाव जिल्ह्यात!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान दुर्घटनेच्या निमित्ताने अनेक नेत्यांचा उल्लेख पुढे आला आहे. सकाळी बारामती येथे झालेल्या लँडिंग दरम्यान दुर्घटनेत उपमुख्यमंत्र्याला महाराष्ट्राने गमावले. हा राज्याला मोठा धक्का आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com