Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान कोसळलं; शिकाऊ वैमानिक सुरक्षित

Baramati aircraft crash, trainee pilot safe: आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घडली घटली. रेडबर्ड कंपनीचे विमान होते. अपघातानंतर विमानाचे नुकसान झाले आहे.
 Baramati Plane Crash
Baramati Plane CrashSarkarnama
Published on
Updated on

Baramati News: बारामतीत पुन्हा विमान कोसळलं असल्याची माहिती समोर येत आहे. गोजुबावी गावच्या हद्दीत शिकाऊ विमान कोसळलं असल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घडली घटली. रेडबर्ड कंपनीचे विमान होते. अपघातानंतर विमानाचे नुकसान झाले आहे. वैमानिक सुरक्षित असल्याचे सुत्रांनी सांगितले.

गोजूबावीनजिक दुधेवस्ती येथे विमान कोसळले. हे विमान श्रीपल नावाचा शिकाऊ वैमानिक एकटाच चालवत असल्याची माहिती प्राप्त होत आहे.

आटोळे वस्तीवर येथील रेड बर्ड कंपनीचे शिकाऊ विमान सकाळी दुर्घटनाग्रस्त झाले. अपघाताचे नेमके कारण समजलेले नसून यातील वैमानिकांना सुदैवाने कोणतीही मोठी इजा झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

टेकनम व्हीटी आरएफआय जातीचे हे शिकाऊ विमान असून या विमानात दोन वैमानिक बसू शकतात. विमान धावपट्टीवर उतरताना हा अपघात झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असून यात विमानाचेही नुकसान झाले आहे.

 Baramati Plane Crash
NEET Exam Paper Leak: NEET पेपर लीकनंतर नाशिक पुन्हा चर्चेत; तीस वर्षांपासून पेपरफुटीचे केंद्र म्हणून बदनाम

सुदैवाने वैमानिक सुखरुप आहे. या बाबत रेडबर्ड कंपनीचे अधिकारी तसेच पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आहे. बारामती एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या गाडयांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातानंतर रेडबर्ड कंपनीच्या प्रशासनाकडून लगेचच कपडे घालून विमान झाकण्याचा प्रयत्न केला गेला. कंपनीकडून या बाबत अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती.

अपघाताची परंपरा...

बारामतीत रेडबर्ड कंपनीने वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरु केल्यानंतर अनेकदा त्यांच्या विमानाचे विविध कारणांनी अपघात झालेले आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये तसेच त्या नंतर ऑक्टोबर 2023 मध्ये चार दिवसांच्या अंतराने दोन अपघात आणि पुन्हा ऑगस्ट 2025 मध्येही अपघाताची नोंद आहे. जवळपास चार अपघाताची नोंद असून डीजीसीए यांनी या कंपनीवर या पूर्वीही उड्डाण करण्यास बंदी घातलेली होती.

 Baramati Plane Crash
NEET Paper Leak: NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र कनेक्शन? नाशिकमध्ये तयार झाली पहिली कॉपी; टेलिग्राम-व्हॉट्सॲपवर प्रश्नपत्रिका व्हायरल

बारामती विमानतळाच्या विकसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर बारामती विमानतळावर विमानांना उतरण्यास बंदी घालण्यात आल्याने सगळे व्हीआयपी हेलिकॉप्टरमधूनच बारामतीत उतरत आहेत. या विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बाबत उपाययोजना होण्याची पुन्हा एकदा मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com