Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण; राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यासह पदाधिकाऱ्यांची सीआयडीकडून आठ तास चौकशी

NCP Leaders Questioned by CIDNews : सीआयडीकडून या चौकशीबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात येत असून राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाच्या एका नेत्यासह 40 पदाधिकाऱ्यांची सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली.
Santosh Deshmukh 5
Santosh Deshmukh 5Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : वीस दिवसांपूर्वी केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. शनिवारी बीडमध्ये मोर्चा निघाला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे सीआयडीकडून या चौकशीबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात येत असून राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाच्या एका नेत्यासह 40 पदाधिकाऱ्यांची सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सीआयडीकडून वाल्मिकी कराड यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली होती, आता या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. त्यानुसार रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या नेत्यासह 40 पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. बीड शहर पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Santosh Deshmukh 5
Santosh Deshmukh Murder Case : 'तो' मोठा नेता कोण? नाव जाहीर करा; अपहरणासाठी वापरलेल्या वाहनातील मोबाईलवरून अंजली दमानिया आक्रमक

राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षांची आठ तास चौकशी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. बारा वाजता चौकशीसाठी आलेल्या संध्या सोनवणे या सव्वा आठ वाजता पोलीस ठाण्याच्या बाहेर निघाल्या.

Santosh Deshmukh 5
Santosh Deshmukh Murder Case : 'वाल्मिक कराड रोज एक कोटी रुपये घेऊन जात होता', आमदाराच्या दाव्याने खळबळ

या चौकशीनंतर राष्ट्रवादी (NCP) युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे म्हणाल्या, 'मला चौकशीसाठी बोलावले होतं. त्यांनी जी प्रश्न केली, मी त्यांना उत्तर दिले आहे. यानंतरही चौकशीसाठी बोलावले तर मी येईल. मला फोन आला होता. तुम्हाला चौकशीसाठी यावे लागेल, त्यामुळे मी आले.' रविवारी दिवसभरात जवळपास 40 पदाधिकाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी करण्यात आली.

Santosh Deshmukh 5
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट; वाल्मिक कराडसह चार आरोपींवर केली 'ही' कारवाई

दरम्यान, सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीडमध्ये दाखल झाले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कात असलेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. अधिकृत माहिती देण्यास सीआयडी अधिकाऱ्यांनी नकार दिला असून आतापर्यंत शंभरहून जास्त लोकांची चौकशी करण्यात आली.

Santosh Deshmukh 5
Prajakta Mali Vs Suresh Dhas : ‘प्राजक्ता, या लढाईत तू एकटी नाहीस’; सुरेश धसांचे कान टोचत चित्रा वाघांचा माळीला पाठिंबा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com