"निलंबन रद्द करण्यासाठी सगळीकडे फिरुन झाले, आता ते योग्य ठिकाणी आलेत"

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विधीमंडळ अधिवेशनाचा पहिला दिवस गाजवला.
Bhaskar Jadhav, devendra Fadnavis

Bhaskar Jadhav, devendra Fadnavis

Sarkarnama

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेत आजही दिवसभर १२ आमदारांच्या निलंबनाचा (12 MLA Suspension) मुद्दा चांगलाच गाजला. या निलंबित १२ आमदारांनी निलंबन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे अर्ज केला आहे. त्यानुसार आता पुढचा निर्णय ते घेणार आहेत. मात्र यावर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी या आमदारांना "निलंबन रद्द करण्यासाठी सगळीकडे फिरुन झाले, आता ते योग्य ठिकाणी आलेत" असा टोला हाणला.

गत अधिवेशनाप्रमाणेच भास्कर जाधव यांनी विधीमंडळ अधिवेशनाचा पहिला दिवस गाजवला. आज वीजबिलाच्या मुद्यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) विधानसभेत उत्तर देत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या १५ लाख रुपयांच्या घोषणेचा (15 Lakhs Controversy) उल्लेख केला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्षेप घेतला. राऊत यांनी याचे पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी, असे खुले आव्हान फडणवीस यांनी दिले. फडणवीस आक्रमक झाल्यानंतर भास्कर जाधव राऊतांच्या मदतीसाठी धावून आले.

जाधव म्हणाले, विरोधी पक्षनेते शब्दखेळ करत आहेत. २०१४ पूर्वी पंतप्रधान हे बोलले आहेत. 'काला धन लाने का की नही लाने की, कहा रखने का,' असे मोदी म्हणाल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यानंतर फडणवीस पुन्हा आक्रमक झाले आणि पंतप्रधानांची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना निलंबित करा. बहुमताच्या भरवशावर अशी नक्कल करत असाल तर त्याची लाज वाटली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. यानंतर भाजपच्या सर्व आमदारांनी भास्कर जाधव यांनी माफी मागावी यासाठी घोषणाबाजी सुरू केली.

<div class="paragraphs"><p>Bhaskar Jadhav, devendra Fadnavis</p></div>
अधिवेशनातील आजचा चेहरा : `शिवसेनेच्या मनातील अध्यक्ष` भास्कर जाधव

अखेर विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून जाधव यांनी अंगविक्षेप व शब्द मागे घेत असल्याचे जाहीर केले. पण त्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. जाधव यांनी माफी मागण्याची मागणी त्यांनी लावून धरली. त्यावर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली. यानंतर ते म्हणाले, मी देशाच्या पंतप्रधानांची मी कोणत्याही प्रकारची नक्कल केली नाही. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी यांनी १५ लाखांबद्दल काय म्हटले होते ते मी बोलून दाखवले. त्यावर मी अंगविक्षेप केला असा भाजपने आरोप केला. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने दुसऱ्यांचे भाषण बोलून दाखवतात, दुसऱ्यांबद्दल बोलून दाखवतात. भाजपचे नेते देखील कोणाबद्दल काय काय बोलतात हे सगळे बघतात त्यांना सगळे माफ? असा सवाल विचारला.

"१२ आमदारांच्या निलंबनाचा बदला"

भास्कर जाधव पुढे म्हणाले, ५ जुलैला अधिवेशन झाले, त्यावेळी मी त्यांचे १२ आमदार निलंबित केले. ज्या दिवशी निलंबन झाले त्याच दिवशी मी विसरून गेलो, मात्र ते विसरले नाहीत. त्यामुळे मी पंतप्रधानांचा नक्कल केली असे ओढूनताणून आरोप करत आहेत, त्यात काही तथ्य नाही. संसदीय आयुध वापरून कोंडीत पकडले तर त्यांची कोंडी फोडण्यात मला आनंद वाटेल. मलाही माझं कौशल्य पणाला लावता येईल. कायदेकानून पुढे करून बोलण्याचा प्रयत्न केला तर भास्कर जाधव त्यातही कमी पडणार नाही.

<div class="paragraphs"><p>Bhaskar Jadhav, devendra Fadnavis</p></div>
पटोलेंच्या मंत्रीपदासाठी ऊर्जामंत्री राऊतांना द्यावा लागणार 'शॉक'

नितीन राऊत यांनी विजेच्या मुद्द्यावर पंतप्रधानांच्या १५ लाखांचा उल्लेख केला, आणि फडणवीस यांनी जे म्हटले ते अतिशय शब्द चातुर्य होते शाब्दिक छळ होता. फडणवीसांना असे म्हणायचे होते की ते बोलले तेव्हा ते पंतप्रधान होते. त्यामुळे जेव्हा ते बोलले त्याची नक्कल मी केली. त्यावेळी पंतप्रधान नव्हते, त्यामुळे त्यांचा अपमान होऊ शकत नाही.

"आता ते योग्य ठिकाणी आलेत"

१२ आमदारांचे निलंबन झाल्यावर भाजप राज्यपाल, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी गेले. पण त्यात त्यांचे काही कोणी निलंबन मागे घेऊ शकत नाही. त्यांचे निलंबन कायद्याच्या चौकटीत झाले. आता ते योग्य ठिकाणी आले. आता ते अध्यक्षांकडे आले असतील तर अध्यक्ष निर्णय घेतील, असे म्हणत भास्कर जाधव यांनी आपण केलेली कारवाई योग्य असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com