Bhigwan Case : मुलीने जबाब बदलला, भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; जहीर शेखवर गुन्हा दाखल!

Jahir Sheikh Bhigwan Police : राज्यभर गाजलेल्या भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. मुलीने पोलिसांना दिलेला जबाब बदलत जहीर शेख याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Bhigwan girl abduction truth revealed
Bhigwan girl abduction truth revealedsarkarnama
Published on
Updated on

Bhigwan Kidnapping Case : भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे. आपण मुलासोबत स्वतःच्या मर्जीने गेल्याने तरुणीने सांगितले होते. मात्र, आता जहीर शेखने आपले अपहरण केल्याची तक्रार केली आहे. तिने आपल्यावर लैगिंक अत्याचार करुन कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

तिच्या तक्रारीनसुार जहीर शेखसह चौघांविरोधात अपहरण आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी तरुणीने जहीर शेखसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगत स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत गेल्याचे जबाब दिला होता. मात्र आता मुलीने तिचा जबाब बदलला आहे.

फेब्रुवारी महिन्यात भिगवनमधील मुलीचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या जहीर शेखने अपहण केल्याची तक्रार मुलीच्या भावाने दिली होती. मात्र, मुलीने जहीर शेख सोबत व्हिडिओ पोलिसांना पाठवून आपले अपहरण झाले नाही. स्वतः जहीरसोबत गेलो असून आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगितले होते.

Bhigwan girl abduction truth revealed
KDMC Blackmail Case : धक्कादायक! महिलेला ब्लॅकमेल करत शारीरिक संबंधांची मागणी, महापालिकेतील कर्मचाऱ्याचे कांड!

या प्रकरणाच्या विरोधात मुलीवर दबाव असल्याचा आरोप तेव्हा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता. तसेच मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, मुलीने कोर्टात देखील जबाब मुलाच्या बाजुने दिला होता. मात्र, आता दोन महिन्यानंतर मुलीने आपला जबाब बदला असून जहीर याने आपले अपहरण केल्याचे म्हटले आहे.

Bhigwan girl abduction truth revealed
Dombivli Crime : माणुसकीला काळीमा! पाच वर्षीय मुलीचा विनयभंग; पुजाऱ्याला अटक!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com