Mumbai News : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपची ताकद वाढणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपमध्ये (Bjp) येण्यासाठी प्रयत्न करीत असून, त्यासाठी ते दिल्लीमधील नेत्यांच्या गाठीभेटी घेत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
दोन दिवसापूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत प्रवेशाबाबत चर्चा केली असल्याची महिती समोर येत आहे. ( Eknath Khadse Political News)
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतत असल्याच्या चर्चांनी वेग घेतला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता एकनाथ खडसे यांनीच भाजपमधील प्रवेशातील चर्चां जोरात सुरू आहेत.
यावर दिल्ली दरबारी चर्चा सुरू असून, शनिवारी संध्यकाळपर्यंत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपची ताकद वाढणार आहे. त्यांच्यासोबत आणखी काही जळगाव जिल्ह्यातील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये येण्यासाठी दिल्लीमध्ये जाऊन भाजपच्या नेत्यांची भेट घेतली व चर्चा केली. या भेटीनंतर खडसे यांनी दिल्लीमध्ये वैयक्तिक कामासाठी गेलो असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानंतर शनिवारी दुपारनंतर लवकरच ते भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या प्रवेशाची वेळ शनिवारी रात्री ठरणार आहे. त्यांच्यासोबत आणखी काही जळगाव जिल्ह्यातील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.
R