Eknath Shinde Big Announcement : 'एसटी' कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता महागाई भत्ता मिळणार

ST Employee News : '' महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीला ओळखले जाते...''
MSRTC Bus & CM Eknath Shinde
MSRTC Bus & CM Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार आहे. तसेच १० वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात येणार आहे. या योजनेला धर्मवीर आनंद दिघे नाव देण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.

एसटी महामंडळाचा बुधवारी(दि.१४) वर्धापन दिन आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा केली आहे.  शिंदे म्हणाले, एसटीबद्दल सगळ्यांना सहानुभूती आहे. मोफत प्रवास आणि महिलांना आरक्षण दिल्यामुळे सगळ्यांना जरा भीती वाटत आहे. हम भी किसीसे कम नही असंही एसटीनं आता दाखवले असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले.

तसेच आजचा वर्धापन दिन सोबतच अमृत महोत्सव दिन आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीला ओळखले जाते. मी जुनी एसटी पाहिली, तीही चांगली आहे. जुनं ते सोनं अस म्हटलं जातं असंही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

MSRTC Bus & CM Eknath Shinde
Atul Londhe News : काँग्रेस नेत्यानं 'टिफीन बैठकां'वरुन भाजपला डिवचलं; म्हणाले,'फाईव्ह स्टार' हॉटेलमधील जेवण मागवून...!''

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं मागील काही दिवसांपासून निर्णयाचा धडाका लावला आहे. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ताबाबत अधिकृत परिपत्रक काढत दिलासा दिला आहे. आता एसटी कर्मचाऱ्यां(ST Employee) ना राज्यातील इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अर्थात ३४ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

MSRTC Bus & CM Eknath Shinde
Supriya Sule News : सुप्रिया सुळे संतापल्या! केंद्रीय मंत्र्यांचा दिल्लीत जाऊन करणार 'करेक्ट कार्यक्रम'

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ताबाबतचा निर्णय गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित होता. राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यास उशीर होत असल्यानं एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या. अखेर काही महिन्यांपूर्वी राज्य सरकार(State Government)नं मोठा निर्णय घेत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कारण महागाई भत्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांवर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासन आदेशानुसार १ जुलै २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के होणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com