Atul Londhe News : काँग्रेस नेत्यानं 'टिफीन बैठकां'वरुन भाजपला डिवचलं; म्हणाले,'फाईव्ह स्टार' हॉटेलमधील जेवण मागवून...!''

Congress Vs BJP : '' 9 वर्षे भ्रष्टमार्गाने खा-खा खाल्ले तरीही...''
Atul Londhe News
Atul Londhe News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांची भाजपकडून जोरदार तयारी सुरु केली असून मिशन ४८ निश्चित केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतेमंडळीमधील बैठका, दौरे यांना वेग आला आहे. याचवेळी भाजपकडून सध्या राज्यात विविध ठिकाणी 'टिफीन बैठका' आयोजित केल्या जात आहेत. मात्र, यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून काँग्रेसकडून भाजपच्या टिफिन बैठकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे(Atul Londhe) यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. लोंढे म्हणाले, भारतीय जनता पक्षाला निवडणुका आल्या की, जनतेची आठवण येते व इव्हेंटबाजी करुन जनतेचे कैवारी असल्याचा आव आणतात. आताही निवडणुकांचे दिवस सुरु असल्याने भाजपा नेते टिफिन बैठका घेत आहेत.

भाजपाच्या आशिर्वादाने देशातील जनता महागाईने एकवेळचे जेवणही करु शकत नाही आणि भाजपा नेते मात्र फाईव्ह स्टार हॉटेलमधील जेवण मागवून 'टिफीन बैठका' घेण्याची नौंटकी करत आहेत असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

Atul Londhe News
Ajit Pawar On Shekhar Bagade : भाजप-शिवसेनेच्या वादाला अजितदादांची फोडणी; पोलीस अधिकारी शेखर बागडेंची कुंडलीच मांडली

भाजपकडून गरिबांची थट्टा...

काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी भाजप(BJP) गरिबांची थट्टा करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, खाद्यतेल 80 रुपयांवरून 200 रुपये लिटर, पीठ 28 रुपयांवरून 40 रुपये किलो, दूध 40 रुपयांवरून 60 रुपये लिटर, डाळी 150 रुपये किलो तर गॅस सिलिंडर 450 वरुन 1200 रुपये झाले असल्याने सामान्य जनता महागाईत होरपळून निघत आहे. रोजगार घटत आहेत, शेतमालाला भाव नाही. त्यातच 9 वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची असा उपरोधिक चिमटाही त्यांनी यावेळी काढला.

9 वर्षे भ्रष्टमार्गाने खा-खा खाल्ले तरीही...

टिफिन बैठकांच्या नावाखाली भाजप नेते मस्त पार्ट्या झोडत असून भाजपाने 'चाय पे चर्चा' नंतर आता 'टिफिन बैठकी'चा नवा फंडा आणला आहे. मोदी सरकार(Modi Government)ला 9 वर्ष झाल्यानिमित्त भाजपानं खायचा हा नवा फंडा आणला आहे. 9 वर्षे भाजपाने भ्रष्टमार्गाने खा-खा खाल्ले तरीही त्यांना पुन्हा खायचेच डोहाळे लागले असल्याचा खोचक टोलाही लोंढे यांनी यावेळी भाजपला लगावला.

जनता उपाशी,भाजपवाले तुपाशी....

मोदी सरकारच्या काळात जनता उपाशी असून भाजपावाले मात्र तुपाशी आहेत असल्याची टीका काँग्रेसनी केली आहे. यावेळी त्यांनी 140 कोटी लोकसंख्येतील 80 कोटी लोकांना मोफत धान्य देणे हे अभिमानाची नाही तर लाजीरवाणी बाब आहे असल्याचं म्हटलं आहे.

Atul Londhe News
Pimpri-Chinchwad: ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात राष्ट्रवादी मैदानात; तातडीने कारवाई करण्याची मागणी

मंत्री महाजनांचा साधेपणा....

राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यातील साधेपणा दाखविणारा आणखी अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आजूबाजूने कार्यकर्त्यांचा गराडा अन् मधोमध गिरीश महाजन बसलेले दिसत आहे. जेवण जेवण्यासाठी महाजन कार्यकर्त्यांसोबत जमिनीवर मांडी घालून बसलेले आहेत. यावेळी महाजनांनी प्रत्येकाच्या ताटातून प्रेमाचा घास खाल्ल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com