
BJP vs RJD Bihar politics : बिहार निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू लागले आहेत. भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज गया इथं सभा होत आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी केलेल्या ट्विटचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत.
गडचिरोलीमधील भाजपचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोली पोलिसांकडे तक्रार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट करताना, समाजात तेढ निर्माण होईल, असे ट्विट केल्याप्रकरणी तेजस्वी यादव यांच्यावर कारवाई व्हावी, अशी ही मागणी केली आहे.
तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्याविरोधात आमदार मिलिंद नरोटे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, "यादव यांनी पंतप्रधानांविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे. यामुळे देशातील नागरिकांमध्ये संभ्रम, संताप पसरू शकतो. काही समाजविरोधी प्रवृत्ती राजकीय हेतू साध्य करण्यासाठी देशातील सामाजिक सौहार्द, शांतता व सुरक्षिततेला बाधा अणण्याचा प्रयत्न करत आहेत." यादव यांच्या या ट्विटमुळे आणि त्यातील वक्तव्यामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर डागळत आहे, असेही नरोटे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
भाजपच्या (BJP) काही कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांचं हे ट्विट आमदार मिलिंद नरोटे यांच्यापर्यंत पोचवले. आमदार नरोटे यांनी ट्विटमधील आशय पाहिल्यावर त्याचे गांभीर्य वाटले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी टीका करताना, त्याआडून देशाला लक्ष्य केल्यासारखे आहे. हे ट्विट गडचिरोलीसारख्या संवेदनशील भागासाठी धोकादायक ठरू शकते, असेही आमदार नरोटे यांनी म्हटलं आहे.
आमदार मिलिंद नरोटे यांनी तेजस्वी यादव यांच्या अटकेची मागणी केली आहे. कारण, देशात धार्मिक, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील असलो तरी, यादव यांच्या या ट्विटचा परिणाम सामान्य जनतेच्या सुरक्षेवर होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी तातडी कारवाई करावी, असे म्हटले आहे.
पोलिसांनी तेजस्वी यादव यांच्या ट्विटकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी आमदार नरोटे यांनी केली आहे. गडचिरोली शहरात काही भागांत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युवांना देशविरोधी मानसिकतेच्या आहारी नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार अत्यंत घातक असून, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे सांगून तेजस्वी यादव यांच्या ट्विटरवरील संबंधित लिंकही पोलिसांना दिल्याचे आमदार नरोटे यांनी सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.