Vice President election history: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 38 वर्षांपूर्वीच्या 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?

38 years history repeat News : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. आगामी काळात होत असलेली ही निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
shankar dayal shrama, cp radhakrishn
shankar dayal shrama, cp radhakrishn Sarakarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी महिनाभरापूर्वी तडकाफडकी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. आगामी काळात होत असलेली ही निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या रिंगणात भाजपप्रणीत एनडीए आघाडीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना रिंगणात उतरवले आहे तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने सुदर्शन रेड्डी यांना संधी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक एकदाही बिनविरोध झालेली नाही.

त्याशिवाय योगायोग म्हणजे 1987 मध्ये शंकर दयाळ शर्मा हे बिनविरोध निवडून आलेले अखेरचे उपराष्ट्रपती होते. शर्मा हे उपराष्ट्रपती होण्याआधी महाराष्ट्राचेच राज्यपाल होते. त्यामुळे या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 38 वर्षांपूर्वीच्या 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर गेल्या 38 वर्षांत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक एकदाही बिनविरोध झालेली नाही. 1987 मध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शंकर दयाळ शर्मा हे बिनविरोध निवडून आलेले अखेरचे उपराष्ट्रपती आहेत. योगायोग म्हणजे शर्मा उपराष्ट्रपती होण्याआधी महाराष्ट्राचेच राज्यपाल होते. त्यामुळे उत्सुकता लागून राहिली आहे.

shankar dayal shrama, cp radhakrishn
Shivsena Politics : नीलेश राणे केसरकरांना रिटायर्ड करणार? पुढचा आमदार ठरवल्यानं शिवसेनेत 'जिरवा-जिरवी'चं राजकारण रंगणार

शर्मा हे एप्रिल 1986 ते सप्टेंबर 1987 या कालावधीत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यावेळी काँग्रेसकडून (Congress) ज्येष्ठ नेते असलेले शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी ते बिनविरोध निवडून आले होते. पण त्यानंतर 38 वर्षांत असा प्रकार घडलेला नाही. शंकर दयाळ शर्मा यांनी आंध्र प्रदेश, पंजाबसह महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम केले होते. त्यांनी केंद्रात मंत्रीपदही भूषवले होते. त्यावेळी केंद्रात राजीव गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसची सत्ता होती. त्यांच्याकडे प्रचंड बहुमत होते. त्यामुळे विरोधकांकडे संख्याबळच नव्हते. यासोबतच शंकर दयाळ शर्मा यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी उत्तम संबंध होते. काँग्रेसचा दबदबा आणि शर्मा यांचे वैयक्तिक संबंध यामुळे 22 ऑगस्ट 1987 रोजी ते बिनविरोध उपराष्ट्रपती झाले होते.

shankar dayal shrama, cp radhakrishn
BJP Politics : उपराष्ट्रपदीपदाच्या उमेदवाराचे नक्षल कनेक्शन, बी सुदर्शन रेड्डी यांच्यावर भाजपचा हल्लाबोल, ठाकरे पवारही टार्गेट

त्यातच आता आगामी काळात होत असलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे 38 वर्षांपूर्वीचा तो इतिहास पहिला तर या निवडणुकीत विजयी होऊन भाजपप्रणीत एनडीए आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन त्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

shankar dayal shrama, cp radhakrishn
Vice president india : 'भाजपमध्ये अस्वस्थता; प्रतिभाताई पाटील मराठी म्हणून ठाकरेंनी पाठिंबा दिला, तसंच तेलंगणा अन् आंध्रमध्ये सुदर्शन रेड्डींसाठी वातावरण

महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले शंकर दयाळ शर्मा हे 1987 मध्ये ते भारताचे आठवे उपराष्ट्रपती झाले आणि 1992 पर्यंत या पदावर कार्यरत होते. त्यानंतर 1992 मध्ये त्यांची भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. 1992 ते 1997 या काळात त्यांनी राष्ट्रपतीपद भूषविले. त्याच प्रमाणे आता सी. पी. राधाकृष्णन त्या इतिहासाची पुनरावृत्ती करीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी होऊन त्यानंतरची राष्ट्र्पती पदाची निवडणूक लढवत विजयी होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

shankar dayal shrama, cp radhakrishn
NCP leader bribery case : अजितदादांचा शिलेदार लाचेच्या मोहात वाहवत गेला; सेवानिवृत्तीच्या तोंडावर सहायक फौजदारही अडकला, आता कोठडीत रवानगी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com