ATS Sangli Action : सांगलीत लॉरेन्स बिश्नोई गँगची एन्ट्री? 'त्या' एका 'लाईक'मुळे तरुण थेट ATS च्या रडारवर!

Maharashtra ATS investigation linked to Bishnoi Gang content : बिश्नोई गँगशी संबंधित सोशल मीडिया व्हिडिओला लाईक केल्याप्रकरणी सांगलीतील एक तरुण ATS च्या रडारवर आला आहे. या घटनेमुळे सोशल मीडिया वापर आणि सुरक्षा यंत्रणांच्या देखरेखीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
Lawrence Bishnoi gang entry in Sangli
Lawrence Bishnoi gang entry in SangliSarkarnama
Published on
Updated on

ATS investigates Lawrence Bishnoi gang link: सांगली जिल्ह्यात सोशल मीडियावरील एका कृतीमुळे मोठी चर्चा रंगली आहे. कुख्यात गँग लॉरेन्स बिश्नोई यांच्याशी संबंधित व्हिडिओंना लाईक केल्याच्या संशयावरून एका तरुणाची दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) चौकशी केली. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले.

चौकशी करण्यात आलेली व्यक्ती मूळची नवी मुंबई परिसरातील घणसोली येथील आहे. मात्र सध्या ती सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात वास्तव्यास आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या व्यक्तीच्या खात्यावरून बिश्नोई गँगशी संबंधित काही व्हिडिओंना लाईक करण्यात आल्याचे तपास यंत्रणांच्या निदर्शनास आले होते.

Lawrence Bishnoi gang entry in Sangli
ATS Raid : ATS ची महाराष्ट्रात मोठी कारवाई! छत्रपती संभाजीनगरसह 3 जिल्ह्यांत छापे, पाकिस्तान कनेक्शन असणारे 6 जण ताब्यात

देशभरात गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित डिजिटल हालचालींवर विविध सुरक्षा यंत्रणा सतत लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून होणारे समर्थन, प्रचार किंवा संशयास्पद संवाद यांचा तपास करण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत आहेत. अशाच तपासादरम्यान संबंधित व्यक्तीचे प्रोफाइल ATS च्या रडारवर आले आणि त्यानंतर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चौकशी करण्यात आली.

तपास पथकाने संबंधित व्यक्तीची सखोल पडताळणी केली. चौकशीदरम्यान महत्त्वाची बाब समोर आली. तपासात असे स्पष्ट झाले की, संबंधित व्यक्ती दिव्यांग आहे आणि त्याचा कोणत्याही गुन्हेगारी संघटनेशी किंवा बिश्नोई गँगशी प्रत्यक्ष संबंध आढळून आलेला नाही. तसेच संबंधित व्हिडिओंना दिलेले लाईक हे जाणूनबुजून नसून अनावधानाने झाले असल्याचेही तपासातून स्पष्ट झाले.

Lawrence Bishnoi gang entry in Sangli
Top 10 News : 15 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; मुंबई महापालिकेत भाजपला लॉटरी! आणखी एक; वाचा टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडी!

यानंतर तपास यंत्रणांनी वस्तुस्थिती समजून घेत आवश्यक नोंदी केल्या. या प्रकरणामुळे सोशल मीडियाचा वापर करताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. एखाद्या पोस्टला लाईक करणे, शेअर करणे किंवा त्यावर प्रतिक्रिया देणे याकडेही तपास यंत्रणा गांभीर्याने पाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद, गुन्हेगारी किंवा आक्षेपार्ह आशयाच्या पोस्टशी संवाद साधताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com