Mahayuti Government News: कट्टर फडणवीस समर्थक आमदारानं बोलून दाखवली मंत्रिपदाची इच्छा; म्हणाले, 'मी मंत्री झालो तर, 10 मंत्र्यांचं काम एकटाच करेन...'

CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज झाले होते.त्यानंतर त्यांनी अनेकदा राणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर मंत्रिपद न मिळाल्यानं खंत बोलून दाखवली होती.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Amravati News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज झाले होते.त्यानंतर त्यांनी अनेकदा राणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर मंत्रिपद न मिळाल्यानं खंत बोलून दाखवली होती. यावेळी त्यांनी आमदार बनून बनून मी त्रासलो आहे, मला देखील वाटतं मी मंत्री झाले पाहिजे,अशा भावना कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आता पुन्हा एकदा रवी राणा यांनी जाहीरपणे मंत्रि‍पदाची इच्छा बोलून दाखवली आहे.

अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी नुकतीच एका जाहीर कार्यक्रमात राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रवी राणा म्हणाले, मी मंत्री झालो तर 10 मंत्र्यांचं काम एकटाच करेन,असं विधान करत रवी राणांनी आपली खदखद आणि मंत्रिपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

आमदार रवी राणा म्हणाले, मी एका गरीब कुटुंबातून पुढे आलो आहे. पण तुम्हांला एक नेहमी सांगावंसं वाटतं, की गरीबी आली तर, लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही. पदं येतात-जातात,कधी संतरजीवर बसावं लागतं,कधी खुर्चीवर.सतरंजीवर बसण्याची तयारी पाहिजे.तोच माणूस खुर्चीवर बसतो,असंही राणा यांनी या कार्यक्रमात म्हटलं.

रवी राणा हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झाले असून महायुतीचे खंदे समर्थक असले मानले जातात. तरी,त्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांची नाराजी दिसून आली आहे. विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत महायुतीला अमरावती जिल्ह्यात भरघोस यश मिळाल्याचं दिसून आलं होतं. या यशात युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांचा मोठा वाटा होता,असं बोललं जातं

CM Devendra Fadnavis
Vidhan Parishad Election: मोठी बातमी: भाजपच्या बड्या नेत्यानं विधान परिषदेची संधी नाकारली; CM फडणवीसांसह प्रदेशाध्यांना कळवला निरोप

त्यामुळे गेल्या वेळेस हुकलेले मंत्रिपद किमान यंदातरी आपल्याला मिळेल, मात्र,मंत्रिपद न हुलकावणी दिल्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सहभागी न होता थेट अमरावतीला दाखल झाले होते. तर रवी राणा यांच्या पत्नी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी जिंदगी हे लढाई जारी हे...,अशा आशयाचा व्हिडिओ शेअर केला होता.यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. तसेच रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.

अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मी मंत्री झालो पाहिजे. ज्यादिवशी मंत्री बनेन, त्यादिवशी मंत्री कसा असतो? हे तुम्हाला मी दाखवून देईल. भविष्यात मला चांगली संधी मिळेल, अशी आशाही व्यक्त केली होती. पण सध्यातरी राणा यांचे मंत्रिपद वेटिंगवरच राहणार असल्याचं निश्चित आहे.

CM Devendra Fadnavis
Imtiaz Jaleel News : महापौर, सभापती महोदय सगळ्या शहराचा विकास करा, एका भागाचा नाही; इम्तियाज जलील यांचा भाजपला टोला!

आमदार रवी राणा यांनी याच कार्यक्रमात मोठा गौप्यस्फोट केला होता. आठ दिवस आधी मला सांगितलं होतं की, तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे. मात्र, मला वेळेवर थांबवण्यात आलं, असं त्यांनी म्हटलं होतं. पण या अमरावती जिल्ह्याची विकासाची दहापट भरपाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करून घेणार आहे. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये. कोणतंही काम असलं तरी आपण मंत्र्यापेक्षा कमी नाही, असं त्यांनी कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com