Namita Mundada : बीड जिल्ह्यातील महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर; केजमधून नमिता मुंदडांना पुन्हा उमेदवारी

Namita Mundada Kaij constituency BJP: भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी रविवारी राज्यातील 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघाचा देखील समावेश आहे.
Namita Mundada
Namita Mundadasarkarnama
Published on
Updated on

Namita Mundada : महायुतीचा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर झाला. केजमधून भाजपने आमदार नमिता मुंदडा यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी रविवारी राज्यातील 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात केज मतदारसंघातून नमिता मुंदडा यांचा समावेश आहे.

2014 साली केजमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पराभूत झालेल्या मुंदडा यांना 2019 साली पक्षाने पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी अचानक आमदार पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला व भाजपची उमेदवारी मिळविली. त्या निवडणुकीत नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे यांचा पराभव केला होता. आता पक्षाने पुन्हा त्यांना उमेदवारी दिली आहे.

Namita Mundada
Nana Patole Politics:१२ जागांचा तिढा कायम, काँग्रेस शिवसेनेचा वाद मिटेना!

दरम्यान, केज मतदार संघावर 1990 पासून मुंदडांचे वर्चस्व आहे. त्यांच्या सासू दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा 1990 व 1999 अशा दोन टर्म भाजपकडून आमदार होत्या. 1999 साली दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे व दिवंगत विमल मुंदडा यांच्यात बिनसल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर त्या लागलीच राष्ट्रवादीत सहभागी झाल्या. त्यानंतर त्या पुन्हा तीन वेळा केज मतदार संघातून राष्ट्रवादीकडून आमदार राहील्या. जिल्ह्यात सलग पाच टर्म आमदार राहण्याचा विक्रम डॉ.विमल मुंदडा यांच्या नावे आहे.

Namita Mundada
Rajendra Maske : भाजपला बीडची गरज उरली नाही, राजीनामा देताना जिल्हाध्यक्षाचा फडणवीसांवर निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com