Beed Political News: भाजपला राजकीय नकाशावर बीडची गरज उरली नाही, असे स्पष्ट दिसत आहे. विरोधकांनाच ताकद आणि रसद पुरविण्याचा संकल्पच देवेंद्र फडणवीसांनी केला आहे, असे आरोप करत भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षाचाही त्याग केला. पक्षाने दुजाभाव केल्याचा आरोप आणि आपल्या कामाची दखल घेतली नसल्याची नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दिवंगत विनायकराव मेटे यांचे विश्वासू असणारे राजेंद्र मस्के अनेक वर्षे शिवसंग्रामाचे जिल्हाध्यक्ष तसेच युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्षही होते. शिवसंग्रामच्या कोट्यातून त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या. मात्र मेटे व मुंडे यांच्यातील राजकीय बेबनावानंतर पंकजा मुंडेंनी मस्के यांना मेटेंपासून दुर करुन भाजपात घेतले. त्यांना पक्षाचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले.
गेल्या वर्षी मस्केंनी आयोजित बैलगाडा शर्यतीवेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडेंनी ‘बाकी सगळे फुस्के; विधानसभेत फक्त राजेंद्र मस्के’ अशी घोषणा करत त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्रच बदलले आहे.
निवडणुकीनंतर पंकजा मुंडे व राजेंद्र मस्के यांच्यात संवाद राहिला नव्हता. त्यामुळे मस्के अस्वस्थ होते. त्यांनी रविवारी समर्थकांची बैठक घेत पक्षाचे जिल्हाध्यक्षपद व पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला.
आता निवडणुकीच्या रणधुमाळीत विचारपूसही केली नाही. भाजपला राजकीय नकाशावर जिल्ह्याची गरज उरली नसल्याचे स्पष्ट होत असून सर्व बळ आणि ताकत विरोधकांना देण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केल्याचा आरोप राजेंद्र मस्के यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.