Congress Vs Shivsena UBT: नाशिक मध्य मतदार संघाचा राज्यातील 12 जागांचा वाद मिटेना. यावर दोन्ही पक्षांत टोकाचा आग्रह आहे. त्यामुळे या वादावर तोडगा केव्हा निघतो याची प्रतीक्षा आहे.
राज्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील बहुतांश जागावाटपंच काम पूर्ण झालं आहे. या संदर्भात काल सायंकाळी आणि आज तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची चर्चा झाली. आता नागपूरच्या दोन मतदारसंघांचा नाशिकच्या मध्य मतदार संघासह बारा जागांवर वाद कायम आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला यातील काही मतदार संघाबाबत कोणतीही तडजोड मान्य नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत याबाबत आग्रही आहेत. आज दुपारी मुंबईत झालेल्या चर्चेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अन्य नेत्यांची या जागांवरून त्यांची शाब्दिक चकमक देखील झाली.
अखेर कालावधी मर्यादित असलेल्या या जागांचा वाद नंतर सोडविण्याचे ठरले. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जागा वाटपांचा तपशील आणि संभाव्य उमेदवारांची यादी घेऊन काही वेळात दिल्लीला रवाना होणार होते.
आज दिल्लीमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हिमाचल भवन मध्ये सायंकाळी सातला बैठक होणार होती. या बैठकीत याबाबतचा अंतिम तोडगा काढण्यात येणार होता. सायंकाळी उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता होती.
काँग्रेस पक्ष आपल्या हक्काच्या मतदारसंघांबाबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड करण्यास तयार नाही. विशेषता लोकसभा निवडणुकीनंतर या पक्षाच्या नेत्यांच्या अपेक्षा जास्तच वाढल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांतील विसंवाद वाढीस लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांकडून याबाबत मध्यस्थीचा प्रयत्न होत आहे. नाशिक शहरातील नाशिक मध्य मतदार संघात काँग्रेस पक्षाला आपला परंपरागत मतदार असल्याने ही जागा सोडण्याची त्यांची तयारी नाही. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष कडून येथे माजी आमदार वसंत गीते यांना उमेदवारी देण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
माजी आमदार गीते यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील आणि राहुल दिवे हे दोन प्रबळ इच्छुक या मतदारसंघासाठी आग्रही आहेत. आता या स्थितीत कोण माघार घेतो यावर हा तिढा सुटणार कसा हे अवलंबून आहे एकंदरच काल सुरू असलेला वाद आजही कायम राहिला.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.