Ajit Pawar Politics: नाशिकमध्ये अजित पवारच महायुतीत मोठा भाऊ, ७ उमेदवार निश्चित!

Nashik Election Candidates 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित केले आहेत.
CM Eknath Shinde, Ajit Pawar & Devendra Fadanvis
CM Eknath Shinde, Ajit Pawar & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Nashik Mahayuti Alliance Candidates: महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण? यासाठी राज्यात विविध नेत्यांनी दावेदारी केली आहे. नाशिक जिल्ह्यात मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये आघाडी घेत महायुतीच्या घटक पक्षांना मागे टाकले आहे.

महायुतीत मोठा भाऊ कोण? याबाबत भाजप सगळ्यात आधी दावा करते. भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार आहेत. याशिवाय अन्य काही अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांची संख्या 113 आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापैकी मोठा भाऊ कोण याबाबत सातत्याने दावे आणि प्रति दावे केले जातात.

जागा वाटपामध्ये राज्यात सर्वाधिक जागांवर भाजपने दावा केला आहे. याबाबत केंद्रीय नेतृत्वाने तसे संकेत चंदीगड येथे झालेल्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. आता काही जागांवरून या पक्षांच्या नेत्यांत मतभेद आहेत.

हे जागावाटप आज निश्चित होण्याची शक्यता आहे. परवा निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात जागावाटप आणि उमेदवार या दोन्हींबाबत महायुतीच्या नेत्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे.

CM Eknath Shinde, Ajit Pawar & Devendra Fadanvis
Shivsena UBT Politics: धुळे शहरात शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कोण? आज निर्णय!

स्थिती काहीही असली तरी नाशिक जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष मोठा भाऊ ठरणार हे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी शनिवारी त्रंबकेश्वर येथे सभा घेऊन प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी इगतपुरी मतदारसंघातील काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात दाखल झालेल्या आमदार हिरामण खोसकर यांची उमेदवारी जाहीर केली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात सहा आहेत.

यामध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (येवला), विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (दिंडोरी), नितीन पवार (कळवण), माणिकराव कोकाटे (सिन्नर), सरोज अहिरे (देवळाली) आणि दिलीप बनकर (निफाड) हे आमदार आहेत.

CM Eknath Shinde, Ajit Pawar & Devendra Fadanvis
Nandgaon Politics: आमदार कांदे, भुजबळ यांच्या विरोधात आता नांदगावकरांचा 'देवदूत' मैदानात!

पंधरापैकी सात जागांवर उपमुख्यमंत्री पवारांची दावेदारी पक्की मानली जाते. या सर्व सात उमेदवारांनी प्रचार देखील सुरू केला आहे. भारतीय जनता पक्षाला आमदार देवयानी फरांदे (नाशिक मध्य), आमदार सीमा हिरे (नाशिक पश्चिम), आमदार राहुल ढिकले (नाशिक पूर्व), डॉ राहुल आहेर (चांदवड) आणि दिलीप बोरसे (बागलाण) असे पाच आमदार आहेत.

मंत्री दादा भुसे (मालेगाव बाह्य)आणि आमदार सुहास कांदे (नांदगाव)हे दोघे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत. आता यामध्ये राहिलेली इगतपुरीची जागा देखील अजित पवार यांना मिळाली आहे. अशा स्थितीत मालेगाव शहर ही देखील महायुतीच्या कोणत्याही पक्षाला जागा मिळाली तरी त्यांचा उमेदवार तेथून निवडून येण्याची शक्यता जवळपास अशक्य आहे.

त्यामुळे भाजप शिवसेना युती असताना भाजप आणि शिवसेनेचा जो वरचष्मा होता, तो महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांचा प्रवेश झाल्याने संपुष्टात आला आहे. नाशिकमध्ये आता उपमुख्यमंत्री पवार गटाचे वर्चस्व असणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यात कोणीही असो नाशिक जिल्ह्यात मात्र उपमुख्यमंत्री पवार हेच मोठा भाऊ म्हणून महायुतीत वावरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com