Nitin Gadkari News : गडकरींनी टोचले भाजप नेते, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांचे कान; म्हणाले...

BJP Mahavijay Convention in Shirdi Assemby Election : नितीन गडकरी यांनी शिर्डीतील महाविजय अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जबाबदारीचे भान करून दिले.
Nitin Gadkari, Chandrashekhar Bawankule, Devendra Fadnavis
Nitin Gadkari, Chandrashekhar Bawankule, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Shirdi News : भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे चांगलेच कान टोचले. "शिवशाही आपला आदर्श आहे. विजय मिळाला आहे. महाराष्ट्राचं सुराज्य करण्याची आपली जबाबदारी आहे. सत्तेचा उपयोग जनतेच्या समृद्धीसाठी व्हावा", अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

भाजपच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गडकरी यांनी आगामी काळात महाराष्ट्राला अधिक विकसित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जोमाने काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. गडकरी म्हणाले, "महाराष्ट्रात औद्योगिक, पर्यटकीय विकास करायचा आहे. महाराष्ट्र पुढे आला, तर हिंदुस्थान बदलेल. विविध राज्यांतील विकासाला पर्यटनाची जोड मिळत आहे. ते तीन पटींनी वाढले आहे. महाराष्ट्रात पंढरपूर, आळंदी, वेरुळ अशा स्थळांना देशाच्या दृष्टीने महत्त्व आहे."

Nitin Gadkari, Chandrashekhar Bawankule, Devendra Fadnavis
Ashok Chavan News : पंकजा मुंडे नांदेडच्या पालकमंत्री? चर्चा आहे! खासदार चव्हाण म्हणाले, तो फार मोठा विषय नाही…

'उद्योग, व्यवसायात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. ऑटोमोबाईलमध्ये आता आपण जपानलाही मागे टाकले आहे. पुढील पाच वर्षांत आपला देश जगात पहिल्या नंबरला पोचल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देश विश्वगुरू करण्यासाठी आपल्याला मदत करायची आहे. जगातील दुसरी अर्थव्यवस्था म्हणून आपल्याला पुढे यायचे आहे', असेही गडकरी यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे

जे काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या काळात झाले नाही, ते सर्व चांगले काम आपल्या काळात झाले पाहिजे. गडचिरोली जिल्हा हा सर्वात मागास होता. गेल्या 25 वर्षांपासून आम्ही तेथे नियोजनपूर्वक काम केले. या जिल्ह्यात लोखंडाच्या खाणी सुरू झाल्या. दहा हजार लोकांच्या हाताला काम मिळाले. हजारो नक्षलवादी समाजाच्या प्रवाहात आणले.

Nitin Gadkari, Chandrashekhar Bawankule, Devendra Fadnavis
Rane Vs Thackeray : उद्धव ठाकरेंचे हात आता छोटे झालेत; नारायण राणे यांचा 'मार्मिक' टोला

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. सर्व तालुके विकसित झाले पाहिजेत. ठाणे, मुंबईत कोणी खुशीने येत नाहीत. मजबुरीने येतात. प्रत्येक गावाचा विकास झाला, तर लोक शहरात कशाला येतील, असे सांगत गडकरी यांनी विकासाची गंगा आता खेड्यांमध्येही वाहायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com