Chhagan Bhujbal News : अमित शाहांची पसंती तरी भुजबळांना का नाही मिळाली उमेदवारी? मोठं कारण आलं समोर

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं 27 मार्चला उमेदवारी जाहीर करत आघाडी घेतली होती. पण, महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्यानं भुजबळांनी माघार घेतली होती.
amit shah chhagan bhujbal
amit shah chhagan bhujbalsarkarnama

Nashik News, 25 May : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी नाव सुचवूनही नाशिकच्या जागेवर महायुतीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी देता आली नव्हती. निर्णय घेण्यास कालापव्यय होत असल्याचं कारण देत भुजबळ हे स्वत:च स्पर्धेतून बाजूला झाले. पण, उमेदवारी न मिळण्यामागे कारण छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

अमित शाह ( Amit Shah ) यांनी नाव सुचवल्यानंतर उमेदवारी घोषित होते अपेक्षित होते. पण, ती झाली नाही. शाह यांच्या निर्णयाला विरोध करण्याचं कारण नव्हते. मात्र, मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्या इशाऱ्यानंतर उमेदवारी घोषित झाली नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. ते एका वृत्तपत्राशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले, "लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मी इच्छूक नव्हतो. गृहमंत्री अमित शाह यांनीच उमेदवारीबाबत महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत सांगितलं. त्यानंतर उमेदवारी घोषित होणे अपेक्षित होतं. मात्र, ती झाली नाही. अमित शाह यांच्या निर्णयाला विरोध करण्याचं कारण नव्हतं."

amit shah chhagan bhujbal
Hemant Godse News : काँग्रेस-ठाकरे गटानं गोडसेंना फोडला घाम? उमेदवार करत आहेत आकडेमोड!

"मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उमेदवारीस विरोध केला असावा. मला उमेदवारी दिली, तर राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या मतांवर परिणाम होऊ शकतो, या जरांगेंच्या इशाऱ्यानंतर उमेदवारी घोषित झाली नाही. नाहीतर निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती तयार केली होती," असं भुजबळांनी म्हटलं आहे.

amit shah chhagan bhujbal
Dindori Constituency 2024 : चांदवडमध्ये केलेले अथक परिश्रम भाजपला यश देणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com