Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी हे अपयश विसरून आता शिवसेना शिंदे गटांनी आगामी विधानसभा निवडणुकींसाठी कंबर कसली आहे. राज्यभरातील सुमारे 100 मतदारसंघाची चाचपणी करण्यात आली.
विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन गुरुवारी झालेल्या बैठकीत शिवसेना (shivsena) शिंदे गटाने प्लॅन तयार केला आहे. 100 जागा लढवण्यासाठी शिंदे गट आग्रही असून या पार्श्वभूमीवर विधानसभानिहाय शंभर प्रभारी व निरीक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. (Eknath Shinde News)
या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अनेक मोठे निर्णय घेतल्याचे समजते. त्यासोबत निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा असा संदेश दिला आहे. आमदारांनी जास्तीत जास्त वेळ मतदारसंघात द्यावा. सदस्य नोंदणी करा, रिक्त असलेले युवा सेना व महिला आघाडीचे पदाधिकारी यांचे पद भरण्यावर भर द्या, राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी जाहीर केलेल्या योजना घराघरात पोहोचवा, असा कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार, प्रमुख पदाधिकाऱ्याना दिला आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा लढण्याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यातील मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आहे. त्यासाठी येत्या काळात या मतदारसंघात निवडणुकीची तयारी करण्यात येणार आहे. त्यासाठी 100 विधानसभा निरीक्षक नेमण्यात येणार आहेत, त्याचबरोबर प्रभारी देखील नेमण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे निरीक्षक आणि प्रभारी फक्त त्याच मतदारसंघासाठी काम करतील. त्याचबरोबर एकाच ठिकाणी हे निरीक्षक लक्ष केंद्रित करणार आणि निवडणुकीची तयारी करतील असे आदेश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीवेळी दिल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्याची माहिती सर्व मतदारसंघात प्रसारित करा. सदस्य नोंदणीवर भर द्यावा, येत्या काळात सर्वांनी मिळून पक्षवाढीसाठी काम करा, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 14 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. त्यातील 8 आमदार ठाकरे गटासोबत आहेत. तर 6 आमदार शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे आताच्या निवडणुकीत मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.