Maharashtra Assembly : बावनकुळेंसह सहा आमदारांना विधान परिषदेत जाण्यास ‘प्रतिबंध'; काय आहे कारण?

Bawankule and six MLAs Barred from Legislative Council : बावनकुळे यांच्यासह प्रवीण दटके, आमश्या पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकूण सहा आमदारांना विधान परिषदेत जाण्यास प्रतिंबंध घालण्यात आला आहे. तशी अधिसूचना महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातून काढण्यात आली आहे. काही गंभीर कारणांमुळे हे प्रतिबंध घालण्यात आलेले नाही, तर सहाही विधान परिषद सदस्य हे आता विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत.

बावनकुळे यांच्यासह नागपूरचे प्रवीण दटके, आमश्या पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते. हे सर्व विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. ते आता विधानसभेत दाखल होणार आहेत. नियमानुसार एकावेळी एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नाही. त्यामुळे 23 नोव्हेंबरपासून या सर्व आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

Chandrashekhar Bawankule
Devendra Fadnavis Cabinet : फडणवीस नागपूरच्या 'या' नेत्याला मंत्रिमंडळात देणार स्थान!

चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेते गेले होते. प्रवीण दटके हे मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून विजय झाले आहेत. त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांचा पराभव केला आहे. ते राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून विधान परिषदेवर गेले होते.

बावनकुळे हे विधानसभेवर गेल्याने त्यांची रिक्त झालेली विधान परिषदेची जागा भरण्यासाठी नागपूर महापालिकेची निवडणूक होणे आवश्यक आहे. सध्या महापालिकेवर सुमारे तीन वर्षांपासून प्रशासक आहे. ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ती निकाली निघाल्यानंतर महापालिकेची निवडणूक होईल. तो पर्यंत नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक असलेल्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Chandrashekhar Bawankule
Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द संघर्षशील; पण आलेख चढताच!

बावनकुळे निवडणूक लढले तेव्हा नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता होती. तब्बल 108 नगरसेवक भाजपचे होते. त्यामुळे बावनकुळे यांना निवडणूक जिंकताना फारशी अडचण आली नाही. दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसने प्रचंड घोळ घातला होता.

अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांचा पाठिंबा शेवटच्या टप्प्यात काढून घेण्यात आला होता. त्यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला होता. प्रवीण दटके यांना देवेंद्र फडणवीस यांनी आपले विश्वासून म्हणून विधान परिषदेत पाठवले होते. आता फडणवीस दटके यांच्याऐवजी कोणाची निवड नागपूरमधून करतात याची उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com