Devendra Fadnavis Cabinet : फडणवीस नागपूरच्या 'या' नेत्याला मंत्रिमंडळात देणार स्थान!

Fadnavis to select Nagpur MLAs for cabinet posts : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच आता नागपूर जिल्ह्यातून ते आपल्या मंत्रिमंडळात कोणाला संधी देणार याचीच चर्चा रंगली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच आता नागपूर जिल्ह्यातून ते आपल्या मंत्रिमंडळात कोणाला संधी देणार याचीच चर्चा रंगली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे नाव यात सर्वाधिक आघाडीवर आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री असताना बावनकुळे हे ऊर्जामंत्री होते. त्यानंतर त्यांच्याकडे अबकारी खातेही सोपवण्यात आले होते. नंतरच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात युवा नेते भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेले परिणय फुके यांना राज्यमंत्री करण्यात आले होते. पर्यटनासह अनेक खाती त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे राजकीय वर्चस्व मोडून काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र 2019च्या निवडणुकीत फुके थोडक्यात पराभूत झाले. ते सध्या राज्यपालनियुक्त विधान परिषद सदस्य आहेत. त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश होईल असे बोलले जात आहे.

Devendra Fadnavis
New CM Devendra Fadnavis : देवाभाऊ... विधान भवनात एकच गजर! आमदार, नेत्यांचा आनंद गगनात मावेना...

सावनेर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री व जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या पत्नीचा पराभव करणारे आशिष देशमुख यांनाही फडणवीस यांनी मंत्री करण्याचा शब्द दिला आहे. पूर्व नागपूरमधून आमदार कृष्णा खोपडे चवथ्यांदा निवडूण आले आहे. यावेळी त्यांनी सव्वा लाखांचे मताधिक्यांनी निवडूण येण्याचा विक्रम केला आहे.

भाजपने याकरिता त्यांना मुंबई भाजपच कार्यालयात बोलावून विशेष सत्कार केला आहे. हा सत्कार त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत मानले जात आहे. हिंगणा विधानसभा मतदारसंघातून समीर मेघे तिसऱ्यांदा निवडूण आले आहेत. त्यांचे नावही यापूर्वी संभाव्य मंत्री म्हणून वारंवार चर्तेत येत होते. मात्र त्यांना संधी मिळाली नाही.

Devendra Fadnavis
New CM Devendra Fadnavis : मंत्रिपदाचं स्वप्न पाहणाऱ्या आमदारांना फडणवीसांनी केलं सावध; पहिल्याच भाषणात काय म्हणाले?

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अमरावतीचे रणजित पाटील हे राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे गृह, नगरसविकास अशी महत्त्वाची खाती सोपवण्यात आली होती. फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जात असत. ते आता आमदार नाहीत. त्यांच्याऐवजी रवी राणा यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com