Maharashtra Assembly Election : विधानसभेच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला? दिवाळीपूर्वीच उडणार बार

Election Commission : लोकसभेच्या निकाला आधीच विधानसभेची गणित मांडण्यात राजकीय नेत्यांनी सुरुवात केली आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपत असल्याने अवघ्या सहा महिन्यात ही निवडणूक होईल.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly ElectionSarkarnama

Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील विधानसभा निवडणुकीचाही मुहूर्त शोधला जात आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार असल्याने त्या आधी म्हणजे येत्या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या निवडणुकांचा बार उडू शकतो. 20 ते 26 ऑक्टोबरला मतदान पार पडण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निकालासाठी अजूनही आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहेत. मात्र, निकाला आधीच विधानसभेची गणित मांडण्यात राजकीय नेत्यांनी सुरुवात केली आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपत असल्याने अवघ्या सहा महिन्यात ही निवडणूक होईल.

महाराष्ट्र विधानसभेची (Maharashtra Assembly) मुदत जरी 26 नोव्हेंबरला संपत असली तरी हरियाणा विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबरला संपत आहे. या दोन्ही विधानसभा निवडणुका एकत्रच घेण्यात येणार असल्याने ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या निवडणुका पार पाडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Election
Satara Lok Sabha News : निकालापूर्वीच झळकला शशिकांत शिंदेंच्या विजयाचा बॅनर; खंडाळ्यातील कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स

दिवाळीपूर्वीच निवडणूक

यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत आहेत. सणासुदीच्या काळात निवडणुका न घेण्याचे संकेत आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचे बार उडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप लागला कामाला

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदान पार पडल्यानंतर दिल्ली आणि इतर राज्यात सहाव्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे नेते प्रचारासाठी गेले. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेत विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली. त्यामुळे लोकसभेच्या निकालापूर्वीच भाजप विधानसभेच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे.

Maharashtra Assembly Election
Soniya Duhan News : शरद पवारांच्या NCP ला धक्का बसण्याची शक्यता, सोनिया दुहान अजित पवार गटाच्या मार्गावर?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com