BJP Devendra Fadnavis : फडणवीसांची कबुली, मराठा आरक्षणाचा बसलाय फटका; म्हणाले...

Devendra Fadnavis On Maratha Reservation : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप महायुतीला मराठा आरक्षणाच्या नॅरेटिव्हचा फटका बसल्याचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मान्य केले. पण हा नरेटिव्ह जास्त काळ यशस्वी झाला नाही.
Devendra Fadnavis, BJP meeting
Devendra Fadnavis, BJP meetingSarkarnama

Devendra Fadnavis News : दिल्लीत महायुतीच्या बैठकीत हजेरी लावून राज्यात दाखल झालेले भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आढावा बैठकीत मराठा आरक्षणावर मोठे भाष्य केले. "मराठा समाजाला आपण दोनदा आरक्षण दिले. पण ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला, त्या विरोधकांनी त्यावर बुद्धिभेद तयार केला गेला. त्यावरून नॅरेटिव्ह सेट झाला असला, तरी तो यशस्वी झाला नाही", असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "दलित, आदिवासी समाजामध्ये संविधानाविषयी धोक्यात असल्याचा नॅरेटिव्ह तयार करण्यात आला. हा नरेटिव्ह फक्त एखाद्या निवडणुकीपुरता असतो. पुढे तो टिकत नाही. मराठा आरक्षणावर (Maratha Reservation), विशेषतः मराठवाड्यात यावरून मराठा समाजात नॅरेटिव्ह तयार केला. मराठा समाजाला आपण दोन्ही वेळा आरक्षण दिले". मराठा समाजामध्ये 'सारथी'सारखी संस्था असेल, 'अण्णासाहेब' महामंडळ असेल, शुल्क सवलती योजना, वसतिगृह योजना, स्वधारसारख्या योजना राबवल्या. या सर्व गोष्टी आपल्याच काळात झाल्या. तरी देखील मराठा समाजाला फटका या निवडणुकीत आपल्याला पडला, असे सांगितले.

'ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला. त्यांच्या परड्यात मतं गेली. त्यांच्याकडे मतं गेली. पण, हे काही टिकणार नाही. हा बुद्धिभेद टिकणार नाही. हा नरेटिव्ह फार काळ टिकणार नाही. काही प्रमाणात यशस्वी झाले. फार मोठ्याप्रमाणात यशस्वी झाले, असे नाही. हे यशस्वी झाले असते, तर 43 टक्के मतं भाजपला मिळाली नसते. आपला मतदार सगळा गेला असता तर, 43-44 टक्के मतं मिळाली नसते. किमान 2019 भाजपच्या मताशी तुलना केल्यास आता प्रत्यक्ष मतं त्यापेक्षा वाढली आहे. टक्केवारीत आपण एक टक्क्यांनी कमी झालो आहोत. त्यावर काम सुरू केले आहे', असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी, अशी लढाई चांगलीच रंगली. अटीतटीच्या लढाईत भाजप महायुतीकडून अनेक प्रयोग झाले. परंतु महाविकास आघाडी एकसंघपणे निवडणुकीला समोरे गेली आणि निवडणुकीय यश मिळवले. भाजप महायुतीच्या अपयशाची जबाबदारी घेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, अशी भूमिका घेतली. त्यानुसार त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे मागणी देखील होती. देवेंद्र फडणवीस काल महायुतीच्या बैठकीला दिल्लीत होते. तिथे काय निर्णय होतो, याकडे राज्यातील भाजपचे लक्ष लागले होते.

Devendra Fadnavis, BJP meeting
Nitin Gadkari News : नितीन गडकरींचं मताधिक्य घटलं, नगरसेवकांची झाडाझडती सुरू; अनेकांना घरी बसावं लागणार

देवेंद्र फडणवीस यांना अमित शहा यांनी मंत्रीपदावर कायम राहण्याची सूचना केली. दिल्लीतून येताच देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. यात देवेंद्र फडणवीस यांचा आवाज आणि आत्मविश्वास चांगला होता. देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये या बैठकीतून जोश भरण्याचा प्रयत्न केला. नॅरेटिव्हकडे दुर्लक्ष करा, त्यावर मी काय काम करायचे ते करतो, तुम्ही मात्र कामाला लागा, अशा सूचनाही फडणवीस यांनी केल्या.

Devendra Fadnavis, BJP meeting
Manoj Jarange Patil : विधानसभेला नावे घेऊन पाडणार, जरांगे-पाटलांचा सरकारला इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com