Manoj Jarange Patil : विधानसभेला नावे घेऊन पाडणार, जरांगे-पाटलांचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil News : पोलिसांनी जातीय तेढ निर्माण होईल, याचं कारण देत जरांगे-पाटलांच्या उपोषणाला परवानगी नाकारली होती. त्यानंतरही जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत.
manoj jarange patil
manoj jarange patil sarkaranama

Maratha Reservation News : आमचं ध्येय मराठा आरक्षण आहे. सरकारनं ठरलेलं मराठा आरक्षण आम्हाला द्यावं. लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डोक्यावर घेऊ नाचतील. पण, मराठा आरक्षण दिलं नाही, तर विधानसभेला सर्व जाती-धर्माचे 288 उमेदवार उभे करणार. मग नावे घेऊन पाडणार, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे.

मराठ्यांना ठरलेलं आरक्षण देण्यास भाजप आणि शिवसेनेच्या ( Shivsena ) आमदारांनी नेत्याला सांगावं. नाहीत, तुम्हाला बोलण्यास जागा राहणार नाही, असंही जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. तेव्हा, प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

"गोरगरीबांना वेठीस धरलं"

जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) म्हणाले, "मी आचारसंहिता आणि कायद्याचा सन्मान केला. त्यामुळे 4 जूनचं आंदोलन 8 जूनला ढकललं. पण, सरकारकडून विनाकारण गोरगरीबांना वेठीस धरण्यात येत आहे. सरकारनं सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला होत्या त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यासाठी हे उपोषण सुरू आहे."

"लाखो जणांवर गुन्हे दाखल केले"

"मराठा आणि कुणबी एकच आहेत. हा कायदा पारित करण्यासाठी सरकारला आधाराची आवश्यकता आहे. तर, 55 लाख नोंदी आढळल्या आहेत. त्याआधारे सरकार कायदा पारित करू शकते. मुख्यमंत्री आणि फडणवीस यांनी गुन्हे मागे घेऊ, असं आश्वासन दिलं होतं. उलट लाखो जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आमचे अनेक विषय सरकारकडे लेखी स्वरूपात आहेत. ते तातडीनं मार्गी लावावेत," अशी मागणी जरांगे-पाटलांनी केली.

"उपोषण मोडीत काढायचं आहे"

"आमचं आम्हाला आरक्षण द्या. हेच मराठ्यांची लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. आम्हाला राजकारणात जायचं नाही. आंदोलनाविरोधात निवेदन देणारे कोण हे सर्वांना माहिती आहे. सरकारला गोरगरीब मराठ्यांचं उपोषण मोडीत काढायचं आहे. गोरगरीब मराठे मोठे होऊ द्यायचे नाही, हे त्यांचं स्वप्न आहे," असा आरोप जरांगे-पाटलांनी केला.

manoj jarange patil
Manoj Jarange News : अजितदादांचे आमदार पोचले जरांगेंच्या भेटीला, म्हणाले आम्ही..!

"20 वर्षापूर्वी माधव पॅटर्न कसा आला?"

"नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत. पण, त्यांच्या शपथविधीमुळे जनतेला खूप त्रास होतो, असं निवेदन मी देतो. मग शपथविधी घेणार नाहीत का? 2023 मध्ये आम्ही शांततेत आंदोलनाला बसलो होतो. त्यानंतर आमच्यावर हल्ला झाला. हल्ल्यानंतरही आम्ही शांततेत बसलो होतो. मग, महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या. तो जातीयवाद नव्हता का? 20 वर्षापूर्वी माधव पॅटर्न कसा आला? मराठा क्रांती मोर्चाविरोधात प्रतिमोर्चे कसे काढले?" असा सवाल जरांगे-पाटलांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com