Nitin Gadkari News : नितीन गडकरींचं मताधिक्य घटलं, नगरसेवकांची झाडाझडती सुरू; अनेकांना घरी बसावं लागणार

Nagpur Loksabha Election 2024 Result : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी विजयी झाले. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी सुटकेचा निश्वास टाकला. असे असले तरी भाजपला...
Nitin Gadkari News
Nitin Gadkari.Sarkarnama

Nagpur News : महाराष्ट्रातलं भाजपचं मिशन 45 सपशेल फेल ठरलं आणि महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या. देवेंद्र फडणवीसांंचं मास्टर प्लॅनिंग, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं ताकद सोबत असूनही महाविकास आघाडीने 31 जागा जिंकत महायुतीला पराभवाचा धक्का दिला. दिग्गज नेत्यांना विजय झाला पण मताधिक्य घटले तर काहींना हार पत्करावी लागली. पण आता याचमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली असून एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. नागपुरातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मताधिक्य घटले आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) विजयी झाले. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी सुटकेचा निश्वास टाकला. असे असले तरी भाजपला अपेक्षित मताधिक्य मिळाले नसल्याने प्रभागनिहाय आकडेवारी गोळा केली जात आहे. या माध्यमातून कुठल्या नगरसेवकाने काम केले, कोणी केले नाही याची कुंडली तयार केली जात आहे. हे बघता आगामी महापालिकेच्या निवडणुकीत अनेक नगरसेवकांना घरी बसावे लागणार असल्याचे दिसून येते.

भाजप नेते नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा पाच लाखांचे मताधिक्यांनी निवडूण येणार असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात दीड लाखांचेही मताधिक्य त्यांना घेता आले. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकीत अनुक्रमे 3 लाख आणि 2 लाख 17 हजार मताधिक्य त्यांना होते.

महापालिकेच्या निवडणुकीत नागपूर शहरातून 108 नगरसेवक निवडूण आले होते. याशिवाय चार आमदार भाजपचे आहेत. उत्तर नागपूरचा अपवाद वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघातून गडकरी यांना मताधिक्य आहे. मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यात मोठी घट झाली आहे. यामुळे 108 नगरसेवकांचा लेखाजोखा पक्षाकडून घेतला जाणार असल्याचे समजते.

Nitin Gadkari News
Raosaheb Danve : रावसाहेबांचा 'अजब अंदाज', पराभवानंतर देखील ...

पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाने गडकरी यांना सर्वाधिक 80 हजारांचे मताधिक्य दिले. येथे भाजपचे कृष्णा खोपडे आमदार आहेत. नागपूर शहराचे भाजपचे अध्यक्ष नगरसेवक आहे. याच परिसरात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते धर्मपाल मेश्राम नगरसेवक आहेत. शहर अध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्षांच्या प्रभागात गडकरी यांना फक्त साडेसहा हजार इतकी आहे.

या प्रभागात चारही नगरसेवक भाजपचे आहेत. हलबा समाज बहुल असलेल्या कावरापेठ येथे प्रवीण भिसीकर यांच्यासह चारही नगरसेवक भाजपचे आहे. येथून गडकरींना 3 हजार 176 तर हसनबाग प्रभागातून 2 हजार 528 मतांची लिड आहे. हे बघता हलबा आणि मुस्लिम मतदारांची अधिक संख्या असलेल्या प्रभागातून भाजप मोठ्या प्रमाणात वजा झाल्याचे दिसून येते.

हिंदी-मराठी भाषिक तसेच शहराच्या आऊटर भागात असलेल्या कळमना, वर्धामाननगर, पुणापूर, डिप्टी सिग्नल प्रभागातून 8 ते 15 हजारांचे मताधिक्य गडकरी यांना मिळाले आहे. चार आमदारांच्या मतदारसंघात गडकरी यांना मताधिक्य असले तरी आमदार खोपडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मतदारसंघाच्या तुलनेत दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते आणि मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्या मतदारसंघाची कामगिरी जेमतेम आहे.

Nitin Gadkari News
Yogendra Yadav : महायुती की आघाडी, विधानसभेला कोण मारणार मुसंडी? योगेंद्र यादवांनी केली मोठी भविष्यवाणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com