Maharashtra Vidhan Sabha Election: मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेणार याबाबतच्या चर्चा सुरू होत्या.
अखेर रविवारी मोठी घोषणा करत त्यांनी हा सस्पेन्स संपवला. जरांगेंनी आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं कालच्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. यावेळी त्यांनी 14 मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचंही सांगितलं.
शिवाय कोणत्या मतदारसंघातील उमेदवार पाडायचे हे देखील त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) फॅक्टर कोणाला धक्का देणार आणि कोणाच्या विजयाची वाट सोपी करणार याबाबतच्या चर्चा सुरू आहेत.
अशातच आता भाजप नेते मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना जरांगेंनी घेतलेल्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेच्या निर्णयामुळे भाजपच्या राजकीय समिकरणावर काही परिणाम होईल का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता महाजन म्हणाले, "मला माहिती नाही त्यांनी कोणती यादी जाहीर केली आहे.
मी तर या निवडणुकीच्या सर्व भानगडीत होतो, सर्वांशी बोलण्याचा आणि सर्वांशी संपर्क करण्याच काम मी करतोय. त्यामुळे अजून मी त्यांची यादी बघितली नाही त्यांनी काय निर्णय घेतला हे पण मला माहिती नाही." असं महाजन यांनी सांगितलं.
बीड, मंठा, परतूर, फुलंब्री, पाथरी, हाथगाव, धाराशीव-कळंब, दौंड, पर्वती, पाथर्डी, कोपरगाव, शेवगाव, करमाळा हे मतदारंसघ जरांगे पाटील लढवणार आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.