Narayan Rane on Uddhav Thackeray : नारायण राणेंचे ठाकरेंवर तिखटवार तर फडणवीसांवर स्तुतीसुमनं; म्हणाले,त्यांच्या नावातच देव...

Political News: ...तर मग तुम्ही मुख्यमंत्री असताना गुंडगिरी का संपवली नाही?
Narayan Rane on Uddhav Thackeray
Narayan Rane on Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Narayan Rane on Uddhav Thackeray: ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरण आणि उध्दव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेली फडतूस,लाळघोटे गृहमंत्री ही टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. यावरुन राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुनच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

नारायण राणे (Narayan Rane ) यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राणे म्हणाले, मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात गेले नाही. मग तुम्ही मुख्यमंत्री असताना गुंडगिरी का संपवली नाही. तेव्हा घरात बसून राहिले आणि आता बायकोला घेऊन कुणालाही भेटायला जातात. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतः काहीही करू शकत नाही असेही अशी बोचरी टीका राणेंनी यावेळी केली.

Narayan Rane on Uddhav Thackeray
Supreme Court News : ईडी-सीबीआयच्या विरोधातील 14 पक्षांची याचिका SC ने फेटाळली; सरन्यायाधीश म्हणाले...

फडणवीसांवर बोलण्याची लायकी आहे का?

तसेच ज्या देवेंद्र फडणवीस यांना फडतुस म्हणत आहे. त्यांच्यातील कोणतेही गुण उद्धव ठाकरे यांच्यात नाही. सत्ता गेली, मुख्यमंत्रीपद गेलंय. फडणवीस यांच्यावर बोलण्याची लायकी आहे का? फडतूस काय असतो हे दाखवून देऊ. आघाडी प्रामाणिक नाही तर बिघाड आहे. आगामी निवडणुकीमध्ये भाजपचे 400 नेते निवडून येतील असा दावाही नारायण राणे यांनी केला.

गुन्हेगारी करणारा व्यक्ती मंत्री कसा ?

सुशांत सिंगला का मारले गेले? दिशा सालाईन का मारले गेले? वाझे तुमचे जावई आहेत का? गुन्हेगारी करणारा व्यक्ती मंत्री कसा काय होऊ शकतो. नवाब मलिकांवर गुन्हा दाखल होतो जेलमध्ये जातात तरीही कारवाई करत नाही. तीन मंत्री जेल मध्ये गेले. कोरोना काळात आदित्य ठाकरे यांनी 15 टक्के कमिशन घेतले असे गंभीर आरोप राणेंनी केले आहेत.

Narayan Rane on Uddhav Thackeray
Narayan Rane on Uddhav Thackeray : कोरोना काळात लोक मरत होते; इकडे ठाकरे टेंडरमागे 15 टक्के घेत होते, राणेंचा थेट आरोप

...तर याचे परिणाम भोगावे लागतील!

इतकं सगळं करून ही तुम्ही (उद्धव ठाकरे) बाहेर आहात. याचं एकच कारण आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव. त्यांच्यामुळे तुम्ही बाहेर राहिला आहात. नाही तर हे शक्य झालं नसतं.'' ते म्हणाले, ''भाजपचा कोणताही नेता आणि कार्यकर्त्यांसाठी अशी भाषा पुन्हा वापरली तर याचे परिणाम भोगावे लागतील.''

फडणवीसांवर स्तुतीसमुनं...

देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षनेता होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या नावातच देव आहेत. फडणवीस सर्व गोष्टी सांभाळायला समर्थ आहे. भाजपानं २०१४ साली जर उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray)ना आधार दिला नसता, युती झाली नसती तर त्यांचे आमदार काही निवडून आले नसते. ते सत्तेत आले नसते असो कौतुकोद्गार फडणवीसांविषयी काढले.

२०१९ला फडणवीसांना युती करू नका हे...;राणेंचा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीसांना २०१९ लाही मी देवेंद्र फडणवीसांना सांगत होतो की युती करू नका. सगळं संपलंय त्यांचं. काही कामाचं नाही असं नारायण राणे म्हणाले.फडणवीसांनी जर पाठ दाखवून बोट दाखवले तर उद्धव ठाकरे कधीच कारागहात गेले असते.पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्यावर बोलण्याची त्यांची पात्रता नाही असा टोलाही राणेंनी लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com