नितेश राणेंसाठी आजचा दिवस महत्वाचा ; जेल की बेल?

आजच्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. आज सकाळी अकरा वाजता ही सुनावणी होणार आहे.
Nitesh Rane
Nitesh Ranesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनचे कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे नेते, (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार आहे.

गुरुवारी राणेंच्या जामिनावर वकिलांनी बाजू मांडली. त्यानंतरची सुनावणी आज (ता.31) होत आहे. राणेंना शरण येण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला असल्याचे त्यांना अटकेपासूनही संरक्षण आहे, असे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. आजच्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. आज सकाळी अकरा वाजता ही सुनावणी होणार आहे.

या प्रकरणाचा तपास कणकवली पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायलयात धाव घेतली.

चार दिवसापूर्वी नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. मात्र त्यावेळी सरकारी वकील अनुपस्थित राहिल्याने ती सुनावणी आज होणार आहे. नितेश राणे यांच्या बाजूने अॅड. सतीश मानशिंदे आणि अॅड. संग्राम देसाई यांनी बाजू मांडली. तर, सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांचे म्हणणे कोर्टाने मागवले होते. अॅड. भूषण साळवी यांनी ऑनलाइन सरकारी वकील म्हणून बाजू मांडली होती. मात्र, न्यायालयानं अॅड. घरत हजर नसल्याने पुढील सुनावणी ठेवली आहे.

Nitesh Rane
उत्तरप्रदेशात नात्यांमध्येच टफ फाईट ; भाऊ-बहीण, सासरा-सून मैदानात

संतोष परब हल्लाप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांना नितेश राणेंची कोठडी हवी आहे. याप्रकरणी सरकारी वकील आणि पोलिसांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालय निर्णय देणार आहे.

राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने 17 जानेवारीला फेटाळला होता. सुरवातीला राणे यांचा अटकपूर्व जामिनावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला मात्र सत्र न्यायालयाने हा जामीन फेटाळत राणेंना दणका दिला. संतोष परब यांच्याबाजून शिवसेना आक्रमक झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com