
Jalna News : राज्यातील महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून सध्या राजकीय वाद सुरू आहे. तर राज्यातील महिला सरकार 2100 रूपये कधी देणार असा सवाल करत आहेत. दरम्यान लाडक्या बहिणींच्या पैसावरून घरातील दबाव टाकत असतील तर मला सांगा असे आवाहन भाजप नेत्या तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या जालन्यातील बदनापूर तालुक्यातील आन्वी या गावात आश्रम शाळेच्या वस्तीगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी पंकजा मुंडे यांनी, लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर चार पैसे आलेत. आता घरात देखील इज्जत वाढली आहे. आमच्या सरकारमुळे कासोटा घातलेल्या माऊलीच्या अकाउंटवरही पैसे आलेत आणि साडी घातलेल्या महिलेच्या अकाउंटवर. त्यामुळे महिलांना ताकद देण्याच काम या सरकारने केलं आहे. आमच्या या कामामुळेच परत आम्ही या मंचावर सरकारमध्ये बसलो असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
जिथे स्त्रीचा सन्मान होतो, जो समाज स्त्रीला साथ देतो, तो समाज नेहमी चांगल्या दिशेने जात असतो. पण तुमचे पैसे कोणी काढून घेत नाही ना. घरामध्ये कोणी तुमच्यावर पैसै काढण्यासाठी कोणी दबाव तर टाकत नाही ना. जर कोणी काढून घेत असेल, कोणी दबाव टाकत असेल तर मला सांगायचं. मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे, असा दमच यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींच्या घरच्यांना भरला आहे.
यावेळी पंकजा मुंडे यांनी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपावर भाष्य केलं. या आरोपात दमानिया यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीकडून आपल्याकडे फाईल पाठवल्या होत्या असा दावा केला होता.
यावर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, “मला या प्रश्नावर बोलायचे नाही, असे म्हणत नो कॉमेंट्स केलं आहे. तसेच त्यांनी धनंजय मुंडेच्या अनुपस्थितिबद्दलही भाष्य करताना, बीडमधील कार्यक्रमाला जायला उशीर होत असून लवकर पळायचं आहे. पण दुसऱ्यांचे काय चालले हे मला काय माहिती? धनंजय मुंडेंची तब्येत बरीच दिवस झालं बरी नसल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.