Pravin Darekar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही, असे ट्विट राज ठाकरेंनी केले होते. त्यानंतर आज भाजप नेते पियुष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याचे सांगितले. दरम्यान, पटेल यांनी ट्विट करत ही माहिती खोटी असल्याचे सांगितले.
या सगळ्यांमध्ये राज ठाकरेंनी केलेल्या ट्विटवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. दरेकर म्हणाले, 'त्यांनी कोट्या करणं, टीका करणं या पेक्षा नवनिर्माणाचं काम केलं तर बरं होईल. आज आमच्याकडे मनसेचे तालुका प्रमुख भाजपमध्ये आले. याच्यावरून काय होतंय हे त्यांनी बघितलं तर बरं होईल.'
'ते माझे मोठे नेते आहेत. मला घडवण्यात त्यांचा हात आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी जास्त काही बोलत नसतो.', असं देखील दरेकर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या फिरत असल्याचे मी पाहिले आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे अहवाल पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण प्रफुल पटेल यांच्याकडून देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही संस्था आहे. या मोठ्या प्रमाणात निर्णय केवळ आमच्या वरिष्ठ नेतृत्व आणि आमदारांशी सल्लामसलत करून, आमच्या समर्पित पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आणि आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करून घेतला जाईल. राष्ट्रीय पक्ष असल्याने, आम्ही या बाबींमध्ये स्थापित प्रक्रियेचे पालन करतो, असे देखील प्रफुल पटेल यांनी सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.