Raosaheb Danve News : कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात रावसाहेब दानवे झाले आचारी! पोहे बनवून सगळ्यांना खाऊ घातले..

BJP leader Raosaheb Danve graced the wedding of an activist's son, taking part in the celebrations as the chef : पोह्याचा बेत आखला अन् मग काय रावसाहेब दानवेंनी बाह्या सरसावत सरका बाजूला मी करतो, म्हणत हातात खवचा घेतला. पोहे भिजवून झाले होते, कांदा चिरून फोडणीची तयारी करत दानवेंनी, असा काही 'तडका' लगावला की उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला.
Raosaheb Danve Making Food News
Raosaheb Danve Making Food NewsSarkarnama
Published on
Updated on

तुषार पाटील

Bhokardan News : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कार्यकर्त्यांमध्ये रमणारे नेते म्हणून ओळखले जातात. राजकारणातील एक अवलिया व्यक्तीमत्व म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. घोडेस्वारी, बुलेटवरून गावात मिरवणे, बैलगाडी हाकणे, शेतात पेरणी, हातावर भाकरी अन् चटणी घेऊन खाणे यातून त्यांच्या साधेपणाचे दर्शन अनेकदा घडते. तर मतदारसंघातील लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रमातील त्यांचा सहज वावर, पंगतीत सगळ्यासोबत बसणे, वाढणे यामुळे त्यांचे चाहते खूष असतात.

नुकताच रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात मतदारसंघातील फत्तेपूर येथील समाधान गायकवाड या कार्यकर्त्याच्या घरच्या लग्नात दानवे चक्क आचारी झाल्याचे दिसून आले. लग्न घर म्हटलं की लगबग, स्वयंपाकाची घाई, धावपळ आलीच. पण सगळं लग्न तडीस न्यायचं म्हटलं तर पाहुणे, मित्रमंडळी यांची काळजी घ्यावीच लागते. फत्तेपूर गावातील अशाच एका लग्नात रावसाहेब दानवे सकाळीच जाऊन धडकले.

वऱ्हाडी मंडळीसाठी स्वयपांकाची तयारी सुरू होती. (BJP) चुलीवर भली मोठी कढाई ठेवून तयारी सुरू असताना आधी स्वयंपाकाची जबाबदारी असलेल्या गावकऱ्यांसाठी नाश्ता बनवण्याचे ठरले. पोह्याचा बेत आखला अन् मग काय रावसाहेब दानवेंनी बाह्या सरसावत सरका बाजूला मी करतो, म्हणत हातात खवचा घेतला. पोहे भिजवून झाले होते, कांदा चिरून फोडणीची तयारी करत दानवेंनी, असा काही 'तडका' लगावला की उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला.

Raosaheb Danve Making Food News
Raosaheb Danve : 'कलरफुल' रावसाहेब दानवेंची धुळवड; ठाकरे, गांधी अन् राऊतांसह विरोधकांचा रंग दाखवत काढला चिमटा

चवदार पोहे तयार करून दानवे यांनी सगळ्यांना खाऊ घातले, स्वतःही आस्वाद घेतला आणि कार्यकर्त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना शुभेच्छा देत पुढच्या नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले. रावसाहेब दानवे यांचा हा नवा अवतार आणि त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या धुमाकूळ घालतोय. सरपंच, पंचायत समिती सभापती, दोनवेळा आमदार, पाचवेळा खासदार, केंद्रात दोनवेळा मंत्री, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अशी राजकारणातील विविध पदं भुषवलेले रावसाहेब दानवे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

Raosaheb Danve Making Food News
BJP Gift for Muslims : मुस्लिमांसाठी भाजपचा मोठा प्लॅन; पक्षाने केली ‘सौगात-ए-मोदी’ची घोषणा...

खासदार आणि केंद्रात मंत्री असतानाही ते कायम मतदारसंघ आणि लोकांमध्ये मिसळायचे. आधी सततचे दौरे, बैठका, पक्षाचे कार्यक्रम, सभा, मेळावे यामुळे दानवे यांना मर्यादा पडायच्या. आता ते पूर्णपणे संघटेनेच्या कामात असल्यामुळे मतदारसंघच नाही तर राज्यात कुठेही समर्थक किंवा परिचयाच्या व्यक्तीकडे लग्न, कौटुंबिक, धार्मिक कार्यक्रम असेल तर त्याला आवर्जून हजेरी लावत आहेत. मतदारसंघातील जनसंपर्क अधिक घट्ट करण्यावर सध्या त्यांचा जोर आहे. यातूनच दानवे यांचे अनेक नव नवे रुप पहायला मिळत आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com