

BJP News : लातूर महापालिकेची निवडणुक ही विकासकामे, नागरी सुविधा पुरवण्यात कोणता पक्ष यशस्वी होऊ शकतो यावर लढवल्या जाव्यात. निश्चितच विलासराव देशमुख हे मोठे नेते आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. काँग्रेसकडून त्यांच्याच नावाचा वापर करून किंवा त्यावरच फोकस ठेवत प्रचार केला जात आहे. याला अनुसरून मी कालचे विधान केले होते.
विलासराव देशमुखांवर टीका करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. तरी देखील त्यांचे चिरंजीव हे माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या विधानावरून झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलतांना त्यांनी लातूरमध्ये काल केलेल्या विधानामुळे विलासरावांच्या चिरंजीवांचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगितले. वादावर अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली होती, त्यामुळे मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, आता पुढचा प्रश्न घ्या, असे म्हणत चव्हाण यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. छत्रपती संभाजीनगर शहराचे नामकरण झाल्यानंतर महापालिकेत पहिला महापौर भाजपचा झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ही निवडणूक आपल्या सर्वासाठी महत्वाची आहे. प्रदीर्घ काळानंतर ह्या निवडणुका होत आहेत. शहरातील नागरिकांच्या मनात शहराचे नाव बदलावे हे होते. मनपाच्या नावामध्ये बदल व्हावा ही त्यांची इच्छा होती. ती ज्या पक्षाने पूर्ण केली त्या पक्षाचा महापौर तिथे बसला पाहिजे. प्रत्येकाने घराघरात जाऊन पोहोचवले पाहिजे की, आपल्या सरकारने हे केले आहे. ही निवडणूक आपल्या अस्मितेची आहे, ते आपण लोकांपर्यंत पोहोचवल पाहिजे, असे चव्हाण म्हणाले. प्रत्येक मनपा ह्या चांगल्या विचाराच्या हातात असला पाहिजे.तो विचार भाजप शिवाय कोणत्याही पक्षात नहीं.
पारदर्शकता संभाजीनगर महापालिकेत दाखवायची आहे. त्यासाठी काम करा, ही निवडणूक जिंकण्याच्या दिशेने जायचे आहे. त्यामुळे बुथवर जिंकणे गरजेचे आहे. आपण पाच वर्षात काय करणार? जाहीरनाम्यात असणारी प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याचा पर्यंत आम्ही करत असतो. देशात राज्यात एक विचाराचा सरकार असल्याने धोरणात्मक विचार करू शकतो. हा विचार मतदारापर्यंत पोहचवा, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.