

Chandrapur Election Result: राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहे. विधानसभेनंतर पुन्हा एकदा नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीनं जोरदार मुसंडी मारत बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी काही ठिकाणी विजय मिळवला आहे.
पण आत्तापर्यंत समोर आलेल्या निकालात सध्यातरी महायुतीतील भाजपा,राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचाच बोलबाला दिसून येत आहे.एकीकडे या विजयानंतर महायुतीकडून जल्लोष साजरा केला जात असतानाच माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मात्र हा पक्षावरच आगपाखड केली आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत:च्याच पक्षालाच खडेबोल सुनावले आहेत.राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी,विदर्भात मात्र पक्षाला मोठा फटला बसला आहे. त्यात 11 पैकी अनेक नगरपरिषदा भाजपने गमावल्या असल्याचं निकालातून समोर येत आहे. भाजपच्या (BJP) या विदर्भातील निराशाजनक कामगिरीनंतर मुनगंटीवार यांचा पारा चढला आहे.
मुनगंटीवार म्हणाले, विदर्भातील गडचिरोली भंडारा,गोंदिया या चारही जिल्ह्यातील एकाही नेत्याला मंत्री केलेले नाही. काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्राचा नेता केलं. पण भाजपाने मला तर मंत्रिपद दिलंच नाही, पण चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा,गोंदिया या चार जिल्ह्यांतून कोणालाही मंत्रिपद दिलं नाही. शिवाय आम्ही बाहेरच्या लोकांना पक्षात प्रवेश देतोय.त्याचा परिणाम नक्कीच मतदारांवर झाल्याची कबुलीही माजी मंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच पक्षानं माझी शक्तीच हिरावली असं म्हणत चंद्रपुरात गटबाजीसाठी पोषक वातावरण तयार केल्याचा आरोपही केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांपैकी 7 नगरपरिषदांवर काँग्रेसनं नगराध्यक्षपद खेचून आणलं आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 1 तर भाजपनं दोन नगराध्यक्षपदं मिळवलं आहे. विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती अद्याप झाली नसली तरी भाजपचे सुधीर मुनगंटीवार सध्या विरोधी पक्ष नेत्याप्रमाणेच आपल्याच सरकारला धारेवर धरताना दिसून येत आहे.
तर दुसरीकडे माजी मंत्री सुनील केदारांनाही स्थानिकच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. विधानसभेला सावनेर विधानसभा मतदारसंघातील पत्नीच्या पराभवानंतर आता चारपैकी तीन परिषदा त्यांच्या हातून निसटल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सुनील केदारांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारून नगराध्यक्षपदासाठी निवडलेले सर्वच उमेदवार पराभूत झाले आहेत.त्यांचे नेतृत्व व निर्णयावरही शंका घेतली जात असून ही केदारांसाठी मोठा धक्का आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत मात्र केदारांनी एकहाती काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना निवडून आणले होते. त्यामुळे त्यांचे पक्षात चांगलेच वजन वाढले होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर केदारांनी नागपूर जिल्ह्यातील सर्व सूत्रे आपल्या हाती घेतले होते. मात्र, अति धाडस करणे त्यांच्या अंगलट आहे. पण नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर सुनील केदार यांना निवडणूक लढवता आली नव्हती. ते सावनेरमधूर चारवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पण आता नगरपरिषदा गमावण्याची वेळ आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.