Mumbai News: "देशाच्या राजधानीकडे हजारो शेतकरी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातून निघाले आहेत. त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर खिळे ठोकणे, सशस्त्र पोलिसांना उभे करणे, हजारो भिंती उभ्या करणे, अडथळे उभे करणे, हे या लोकशाहीतून निवडून आलेल्या सरकारला शोभत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, हा फक्त पंजाबच्या शेतकऱ्यांचा विषय नसून संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचा आवाज आहे", अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
पंजाबचे शेतकरी संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांचा आवाज उठवत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र कसा योगदान देऊ शकेल, याविषयी लवकर उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करतील. तसेच स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला. पण त्यांच्या शिफारशी लागू करायला सरकार तयार नाही. आता शेतकरी दिलीच्या सीमेकडे कूच करत असताना त्यांच्यावर बंदूक, तोफा, रणगाडे रोखणे, त्यांना जखमी करणे हे प्रयोग सुरू असताना अश्रू नळकांड्या फोडल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे नरेंद्र मोदी परदेशात अबुधाबीच्या राजाबरोबर मेजवानी करत आहेत, हा देशातील शेतकऱ्यांचा अपमान आहे, असं राऊत म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी निर्णय देत दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गटच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिला. या निकालावरुन आता संजय राऊत यांनी नार्वेकरांवर जोरदार निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात मराठी चॅनलवर एक प्रोग्राम चालतो. तो म्हणजे 'हास्य जत्रा' खूप कॉमेडी आहे. हा प्रोग्राम आम्ही सर्वजण पाहतो. राहुल नार्वेकर यांनीही एका नवीन हास्यजत्रेचा एपिसोड लिहिला आहे. खरी शिवसेना जी बाळासाहेब ठाकरे यांची आहे, ती शिंदेंना दिली. तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांना दिली. त्यामुळे लोकं हसत आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
Edited By-Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.