'नथूराम गोडसे व्हायला नका लावू!' म्हणणाऱ्या संग्राम भंडारेंची बाजू पडळकरांनी घेतली; म्हणाले, 'त्यांच्या भूमिकेचे आम्ही समर्थन करतो'

Gopichand Padalkar On Sangram Bhandare : तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या संगमनेरमधील घुलेवाडीतील कीर्तनात गोंधळ आणि धक्काबुकी झाल्याने हिंदुत्वावादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या. संग्रामबापू भंडारे महाराजांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ शेअर करत 'नथूरामजी गोडसे' व्हायला नका लावू असा इशारा देत थोरातांना दिला होता.
Sangram Bhandare Congress leader Balasaheb Thorat And Gopichand Padalkar
Sangram Bhandare Congress leader Balasaheb Thorat And Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. संग्राम बापू भंडारे महाराजांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना "गोडसे व्हायला लावू नका" असा इशारा दिला.

  2. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मालेगावात भंडारे यांच्या भूमिकेचे समर्थन केले.

  3. या विधानामुळे काँग्रेस-भाजप संघर्ष चव्हाट्यावर आला असून महाराष्ट्रात नवा वाद पेटला आहे.

Pune News : गेल्या दोन दिवसांपासून तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. संग्रामबापू भंडारे महाराज यांनी 'नथूरामजी गोडसे' व्हायला लावू नका असा इशारा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना दिला होता. त्यांनी जीवे मारण्याच्या दिलेल्या धमकीने आगामी तेल ओतण्याचे काम केले आहे.

यावरून आता हिंदुत्वावादी संघटना आणि काँग्रेस आमने-सामने आली असतानाच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मुद्द्यात उडी घेतली आहे. त्यांनी आपण संग्राम भंडारे यांच्या भूमिकेचं समर्थन करत असल्याचे म्हटले आहे. ते मालेगावात बोलत होते. पडळकर यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून पुन्हा खळबळ उडाली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी दिली होती. थोरात यांना उद्देशून भंडारे महाराज यांनी, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांनी असा इशारा म्हणजे थेट धमकीच असल्याचे म्हणच सरकारवर टीका केली होती.

Sangram Bhandare Congress leader Balasaheb Thorat And Gopichand Padalkar
Gopichand Padalkar : वादग्रस्त गोपीचंद पडळकरांना आता भाजपही वैतागला? CM फडणवीसांनी पर्याय शोधलाय...

यानंतर आता पडळकर यांनी भंडारे महाराज यांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी घेतलेल्या भूमिकेला आमचा ठाम पाठींबा असल्याचे म्हटलं आहे. संग्राम बापू लव्ह जिहादच्या विरोधात समाजाला सावध करण्याचे काम करत आहेत. ते धर्मांतराच्या मुद्द्यावरही आपले परखड मत मांडतात.

त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला आमचा ठाम पाठींबा असून आम्ही त्यांच्या त्यांच्या या स्पष्ट भूमिकेचे समर्थन करतोय. त्यांच्या कीर्तनावर लोकांचा प्रचंड विश्वास असून त्यालाच काही लोकांचा राग आहे. जिथे जिथे विरोधी गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला. तिथेच त्यांच्या परखड भूमिकेला विरोध होताना दिसत आहे. त्या लोकांमध्ये संग्राम बापू विषयी रोष निर्माण झाल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे.

पडळकरांकडून जाहीर निषेध

कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या संगमनेरमधील घुलेवाडीतील कीर्तनात गोंधळ आणि धक्काबुकी झाल्याचे घटनेचा पडळकर यांनी निषेध नोंदवला आहे. तसेच ते म्हणाले, “कीर्तन हा समाजप्रबोधनाचा एक पवित्र मार्ग आहे. त्या ठिकाणी गोंधळ घालणे म्हणजे हिंदू संस्कृतीचा अपमान आहे.

संग्राम बापू महाराजांनी धर्मरक्षणाची बाजू मांडली, समाजात जनजागृती केली. त्यांच्या या कार्याबद्दल लोकांमध्ये आदर आहे. विश्वास वाढला आहे. पण आता या भूमिकेवर हल्ला होताना दिसत आहे. त्यांची भूमिका काही लोकांना खटकतेय, असा दावा देखील पडळकर यांनी केला आहे.

दरम्यान थोरातांनी संगमनेरची विकासाची वाटचाल सुरूच ठेवणार असून यासाठी विचारसरणी आणि तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याचा सूचक इशारा दिला आहे. त्यांनी, 'मी काही महात्मा गांधी नाही अन् होऊ शकत नाही.

परंतु असा कुणी नथुराम गोडसे समोर आल्यावर, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील', अशीही प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरातांच्या या प्रतिक्रियेचे संगमनेरसह महाराष्ट्रात भावनिक पडसाद उमटू लागले आहेत.

Sangram Bhandare Congress leader Balasaheb Thorat And Gopichand Padalkar
Gopichand Padalkar: रोहित पवारांची 'बेन्टेक्स'ची टीका झोंबली; पलटवार करताना पडळकरांची गाडी थेट शरद पवारांवरच घसरली, म्हणाले,'50 वर्षे त्यांनी...'

FAQs (मराठीत)

प्र.१: संग्राम बापू भंडारे महाराजांनी नेमकं काय विधान केलं?
उ.१: त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना "नथूराम गोडसे व्हायला लावू नका" असा इशारा दिला.

प्र.२: गोपीचंद पडळकर यांनी काय भूमिका घेतली?
उ.२: त्यांनी संग्राम भंडारे यांच्या विधानाचे समर्थन करत ते योग्य असल्याचे म्हटले.

प्र.३: या प्रकरणावरून काँग्रेसची प्रतिक्रिया काय आहे?
उ.३: काँग्रेसने भाजपवर टीका करत हा मुद्दा राजकीय वादाचा ठिणगी ठरत असल्याचे म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com