Gopichand Padalkar: रोहित पवारांची 'बेन्टेक्स'ची टीका झोंबली; पलटवार करताना पडळकरांची गाडी थेट शरद पवारांवरच घसरली, म्हणाले,'50 वर्षे त्यांनी...'

Gopichand Padalkar Vs Rohit Pawar : चंद्रकांतदादा तुम्ही भाजपचं सोनं आहात,पण आताच्या काळामध्ये काही बेन्टेक्स लोकं या जिल्ह्यामध्ये फिरत आहेत. खालंच्या लेव्हलला जाऊन मोठ्या नेत्यांबद्दल बोलत आहेत.
Gopichand Padalkar, Rohit Pawar
Gopichand Padalkar, Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर स्तुतीसुमनं उधळताना भाजपचं खरं सोनं असल्याचं म्हटलं होतं. पण याच कार्यक्रमात पवारांनी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना बेन्टेक्सची उपमा देत त्यांची पाटलांकडे तक्रारही केली होती. आता रोहित पवारांना जशास तसं प्रत्युत्तर करतानाच आमदार गोपीचंद पडळकरांची गाडी थेट ज्येष्ठ नेते शरद पवारांवरच घसरली आहे.

आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार आणि धडाडती तोफ गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांच्या टीकेवर जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले,मुळात डुप्लिकेटपणा हा पवारांच्यात ठासून भरलेला आहे. त्यात रोहित पवार आज्यावर गेला असून त्याच्या आजोबांनी गेली 50 वर्षे सोनं म्हणून पितळ विकले आहे अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, चिंध्या पांघरुण सोनं विकता येत नाही. पण सोनं पांघरुण चिंध्या विकता येतात. या म्हणीप्रमाणे चिंध्या विकण्याचा धंदा पवारांनी केलाय. मात्र, रोहित पवारांची (Rohit Pawar) त्यांच्या चुलत्यांनीच तू कसा निवडून आलाय म्हणत,अब्रू काढली आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नसल्याचा टोलाही पडळकरांनी रोहित पवारांना लगावला.

तसेच पडळकर म्हणाले,मला काळजी अजित पवारांच्या पोरांची वाटत आहे. कारण हा रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे.औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या बापाचा,भावांचा घात केला होता. यामध्ये अजित पवार पुरून उरणारे असल्यामुळेच टिकल्याचंही त्यांनी म्हटलं. परंतु अजितदादांच्या पोरांची चिंता मला वाटते, कारण रोहित पवार औरंगजेबासारखी कृती भविष्यात अजित पवारांच्या पोरांच्या बाबतीत करेल, अशी शंकाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

Gopichand Padalkar, Rohit Pawar
Vice President News: राधाकृष्णन यांना उद्धव ठाकरे पाठिंबा देणार का? विजय वडेट्टीवार म्हणाले, "महाराष्ट्राच्या हितासाठी..."

गोपीचंद पडळकर यांनी त्यामुळे मला चिंता करायची गरज नसून आपण पवारांना कसाही असातसा, उलटा-पुलटा पुरून उरलेलो असल्याचंही म्हणाले. मी त्याबाबत भूमिका घ्यायला पहिल्यापासून ठाम आहे सक्षम आहे, पण आता रोहित पवारांची चिंता अजित पवारांनी करण्याची आवश्यकता असल्याचा दावाही पडळकर यांनी केला आहे.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते ?

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये प्रा.डॉ.एन.डी पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांचं तोंडभरुन कौतुक करताना पडळकरांवर तोंडसुख घेतले होते. यावेळी पवारांनी चंद्रकांत पाटील तुम्ही भाजपचे नेते असले तरी देखील तुम्ही खऱ्या अर्थाने भाजपचं सोनं असल्याचं म्हटलं होतं.

Gopichand Padalkar, Rohit Pawar
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवईंनी टोल वसुलीवरून सरकारला दाखवला आरसा; म्हणाले, 2 तासांच्या पावसात दिल्ली लकवाग्रस्त...

त्या पक्षात तुम्ही अनेक वर्ष राहिलेले आहात.जेव्हा आम्ही तुम्हाला भेटतो. तुम्ही आमचं ऐकून घेता. मुलं किंवा विद्यार्थ्यांचा प्रश्न तुम्ही लगेचच सोडवता. लगेच फोन लावता ही तुमची स्टाईल आम्हाला आवडते. तुमचं राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण असल्याचंही कौतुकोद्गारही काढले.

चंद्रकांतदादा तुम्ही भाजपचं सोनं आहात,पण आताच्या काळामध्ये काही बेन्टेक्स लोकं या जिल्ह्यामध्ये फिरत आहेत. खालंच्या लेव्हलला जाऊन मोठ्या नेत्यांबद्दल बोलत आहेत. त्यामुळे या बेन्टेक्सच्या सोन्याचं काय करायचं ? हे भाजपच्या खऱ्या सोन्याने लक्षात घ्यावं, असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपच्या पडळकरवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com