Imtiaz Jaleel Tiranga Rally : जलील यांची रॅली आमदारकीसाठी; आमदार राणे आणि रामगिरी महाराजांची टीका

Nitesh Rane and Ramgiri Maharaj criticize Imtiaz Jaleel Tiranga rally : 'MIM'चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईच्या दिशेने काढलेल्या तिंरगा रॅलीवर नीतेश राणे आणि रामगिरी महाराजांनी टीका केली आहे.
Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleel Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : छत्रपती संभाजीनगरमधून 'MIM'चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तिरंगा रॅली मुंबईच्या दिशेने काढली असून, भाजप आमदार नीतेश राणे आणि रामगिरी महाराज यांना अटक करा, अशी मागणी केली आहे.

या रॅलीवर रामगिरी महाराज यांनी निशाणा साधला आहे. जलील यांची ही रॅली आमदारकीसाठी आहे, असा टोला रामगिरी महाराजांनी लगावला, तर अशा रॅलीला मी भीक घालत नाही, असे भाजप आमदार नीतेश राणे यांनी म्हटलं आहे.

सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मध्यंतरी मुस्लिमांच्या भावना दुखवल्या जातील, असं विधान केलं होते. यावरून राज्यासह देशात गदारोळ झाला होता. मुस्लिमांनी राज्यातील रस्त्यांवर उतरून फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. रामगिरी महाराज यांच्याविरोधात राज्यात वेगवेगळ्या पोलिस (Police) ठाण्यांमध्ये तब्बल 58 गुन्हे दाखल झाले. यानंतर भाजप आमदार नीतेश राणे यांनी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाचे मोर्चे काढले.

Imtiaz Jaleel
Nitesh Rane : आमदार राणेंच्या अडचणी वाढल्या; सात गुन्ह्यांच्या तपासाला वेग येणार

या मोर्चांमध्ये आमदार राणेंनी मुस्लिमांना टार्गेट करणारी विधान केली. यात देखील राज्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये आमदार राणे आणि मोर्चाचे आयोजक हिंदुत्ववादी (Hindu) कार्यकर्ते दिंगबर गेंट्याल यांच्याविरोधात सात गुन्हे दाखल झाले आहेत. या दोघांवर कारवाईसाठी, अटकेसाठी छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांनी मुंबईच्या दिशेने तिरंगा रॅली काढली आहे. या रॅलीवर रामगिरी महाराज यांनी टीका केली आहे.

Imtiaz Jaleel
Mahayuti News : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा 'फॉर्म्युला' ठरला! भाजप, शिंदे गट अन् 'NCP'तून कोणाला मिळणार संधी?

राणे आणि रामगिरींना अटक झाली पाहिजे

इम्तियाज जलील म्हणाले, "ही रॅली 'MIM' म्हणून काढलेली नाही. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरण बिघडलेले आहे. सरकारने देखील या प्रवृत्तींना गेल्या काही दिवसांपासून प्रोत्साहन देत आहे. जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. देशात संविधान, कायदे आहेत, त्याप्रमाणे कारवाई होणार की नाही? कोणत्याही धर्माचा-जातीचा अपमान केला जात आहे". भाजपच्या नेत्याने मुस्लिमांना मशिदीत घुसून मारणार असे विधान करत आहेत. कायदा आहे की नाही, यावर कारवाईच्या मागणीसाठी आम्ही रॅली घेऊन मुंबईकडे निघालो आहोत, असे इम्तियाज जलील यांनी म्हटलं.

'पॅलिस्टाईन'चे झेंडे फडकवले

'इम्तियाज जलील यांची ही रॅली आमदारकीसाठी आहे, चुकीचे राजकारण करत आहे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे', अशी टीका रामगिरी महाराज यांनी केली आहे. या पाठोपाठ भाजप आमदार नीतेश राणे यांनी देखील रॅलीवर निशाणा साधत, मी अशा रॅलीला भीक घालत नाही, असं म्हटलं आहे. नीतेश राणे यांनी जिहादी, असे म्हणत, या रॅलीचा आणि तिरंग्याचा काय संबंध? असा प्रश्न केला. मोहमंद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्ताने जुलूस काढले गेले. त्यात 'पॅलिस्टाईन'चे झेंडे फडकवले गेले. त्यांचा निषेध का गेला नाही. या रॅलीला मी भीक घालत नाही, असे नीतेश राणे यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com