Ranjitsinh Mohite Patil: सोलापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी घेतली ठाकरेंची भेट

Ranjit Singh Mohite Patil meets Uddhav Thackeray : भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर भाजप पक्षविरोधी कारवाई केल्यावरून कारवाई करण्याच्या तयारीत आहे. अशातच त्यांनी आज (ता.1) मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
uddhav thackeray
uddhav thackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजपचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत सध्या पक्षातच नेमकं काय सुरू आहे. हे कळत नसल्याची स्थिती आहे. एकीकडे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदस्य नोंदणी मोहिमेत एक हजार सदस्यांनी नोंदणी केल्याबद्दल अभिनंदनाचं पत्र पाठवले आहे. यामुळे अधिकच सभ्रम निर्माण झाला आहे. अशातच रणजितसिंह मोहिते पाटील यांनी थेट मुंबई गाठत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर घेतली आहे. याभेटीमुळे आणखीन चर्चांना उधान आले आहे.

भाजपचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचे काम केले नाही. त्यांनी भाजपच्या उमेदवाराविरोधात काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळे पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत कारवाई का करू नये याचा खुलासा करण्याचे आदेश दिले होते. या आदेशावर मोहिते पाटील यांनी उत्तर दिले होते. मात्र सबळ पुराव्यांचा आधार घेत पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता सोलापूरसह राज्यातील राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील आता पुढे काय करणार? असा सवाल अनेकांच्या समोर उभा झाला होता.

मोहिते पाटील ठाकरेंच्या भेटीला

दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. रणजितसिंह मोहिते पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. मात्र त्यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

uddhav thackeray
Ranjit Sinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटलांची ‘सायलेंट’ भूमिका कोणाच्या फायद्याची?

राम सातपुतेंचे आरोप

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला साथ दिली नाही असा आरोप सातत्याने माजी आमदार राम सातपुते करत आले आहेत. तर याबाबत त्यांनीच पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली होती. धैर्यशील मोहिते पाटील यांना, भाजपने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली. यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले. यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भावाचे काम करत भाजपला दणका दिला.

तसेच विधानसभा निवडणुकीवेळी देखील रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप आपल्याला उमेदवारी दिल्यानंतरही मोट बांधली आणि आपल्या विरोदात काम केल्याचा दावा राम सातपुते यांनी केला होता. त्यानंतर पक्षाकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. अशातच आता रणजितसिंह मोहिते पाटलांनी थेट मातोश्री गाठल्याने ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

uddhav thackeray
Ranjit Patil : वैद्यकीय तज्ज्ञ ते गृहराज्यमंत्री असा राहिला रणजित पाटलांचा प्रवास

भाजपचं अभिनंदन पत्र

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सदस्य नोंदणी मोहिम राज्यभर सुरू केली आहे. ज्यात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देखील त्यांच्या मतदार संघात एक हजार सदस्यांनी नोंदणी केली आहे. यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र पाठवून रणजितसिंग मोहिते पाटलांचं अभिनंदन केलं होतं. यानंतर सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये रणजितसिंग मोहिते पाटलांवर कारवाई होणार की नाही असा सवाल उपस्थित करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com