Anil Bonde News : अनिल बोंडेंच्या ‘त्या’ शब्दाने राज्यसभेत गोंधळ; सभापतींना करावा लागला हस्तक्षेप...

Parliament session Rajya Sabha Update : अनिल बोंडे यांनी आक्रमक भाषण करताना काँग्रेसह आम आदमी पक्षावरही जोरदार निशाणा साधला.
Anil Bonde
Anil BondeSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना भाजपचे खासदार अनिल बोडें यांच्या एका शब्दाने गोंधळ निर्माण झाला. त्यांनी ‘लिब्रांडू’ हा शब्द वापरल्याने वाद निर्माण झाला. विरोधकांनी त्यावर जोरदार आक्षेप घेत हा शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली.

बोंडे यांनी भाषणादरम्यान विरोधकांवर जोरदार टीका केली. यादरम्यान त्यांनी लिब्रांडू या शब्दाचा वापर केल्याने गोंधळ निर्माण जाला. गोपालदास नीरज यांचा लेखनाच संदर्भ देत बोंडे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 2014 मध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर खूपसारे लिब्रांडू... असे बोंडे म्हणताच विरोधी बाकांवरील सदस्य त्याविरोधात आक्रमक झाले.

Anil Bonde
Anjali Damania News :'त्यात तुमचीच अब्रु जाईल...', अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले

वाद होताच बोंडे यांनी लिब्ररल हा शब्द वापरत सावरण्याचा प्रयत्न केला. उपसभापतींनी विरोधी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. गोंधळातच बोंडे यांनी पुढे आपले भाषण सुरू ठेवले. पुरस्कार वापसीवरून बोंडे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.

बोंडे यांनी पुढे काही मिनिटे भाषण केले. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी बोंडे यांनी उच्चारलेल्या त्या शब्दावर आक्षेप घेतला. तो शब्द सभागृहाचा अपमान करणारा असल्याचे गोखले म्हणाले. अशा शब्दांचा सभागृहात वापर व्हायला नको, अशी नाराजीही गोखले यांनी व्यक्त केली.

Anil Bonde
Devendra Fadnavis News : वर्षा बंगल्यात राहायला का जात नाही? फडणवीसांनी केला खुलासा, दिवसही सांगितला...

गोखले यांचा आक्षेप गांभीर्याने घेत उपसभापतींनीही रेकॉर्ड तपासून तो शब्द असंसदीय असेल तर कामकाजातून वगळण्यात येईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, बोंडे यांनी भाषणादरम्यान काँग्रेस नेत्यांच्या विधानांवरून जोरदार हल्लाबोल चढवला. महाकुंभ मेळ्यातील डुबकी मारल्याने पोट भरेल का, या मल्लिकार्जून खर्गेंच्या विधानावरही त्यांनी पलटवार केला. हजच्या बाबतीतही तुम्ही असेच म्हणणार का, असा सवाल त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com