Udayanraje Bhosale : उदयनराजे केंद्र अन् राज्य सरकारवर भडकलेच; म्हणाले, 'छत्रपतींबाबत कायदा करायला बजेट लागतं का?'

Udayanraje Bhosale On Central Goverment : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार होत असलेल्या विधानवरून खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यकर्त्यांनी चांगलेच सुनावले आहे.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Vadhu Budruk (Pune) News : पुणे जिल्ह्यात वढू बुद्रुक येथे असलेल्या समाधीस्थळी भापज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केंद्रासह राज सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी सध्याच्या राजकारण आणि महापुरूषांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून केंद्र अन् राज्यसरकारवर सडकुन टीका करत खडेबोल सुनावले.

यावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्यकर्त्यांनी चांगलेच सुनावताना, ज्या स्वराज्यात आपण सगळे राहतोय ती स्वराज्याची संकल्पना शिवाजी महाराजांची होती. सर्वधर्मसमभाव ही भावना घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे एकत्र आणलं. लोकशाहीचा ढाचा शिवाजी महाराजांनी रचला. आपल्यातील कोणीच देव बघितला नाही. पण आमच्यासाठी शिवाजी महाराजांच देव आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर अनेक युगपुरुष जन्माला आले त्यांच्या संरक्षण करण्यासाठी कायदे निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात अनेकदा मी सांगून सुद्धा कोणतेही कायदे निर्माण झालेले नाहीत. कायदा तयार करायला बजेटची गरज नाही, असे त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे कान टोचले आहेत. तर अवमान करणाऱ्यावर मोकासारखा कायदा लागू झाला पाहिजे अशी मागणी केलीय.

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते...; मंत्री नितेश राणेंच्या दाव्यावर उदयनराजेंचा मोठा खुलासा

उदयनराजे भोसले यांनी, शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा वारंवार अपमान व्हावं असं आपल्या लोकप्रतिनिधींना वाटतं का? असा सवाल केला आहे. तर त्यांना जर तसं वाटत नसेल तर त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीनं सिद्ध करून आता द्यावं, असेही म्हटलं आहे.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रखडलेल्या अंतरहाराष्ट्रीय स्मारकावरून तोफ डागताना यास्मारकासाठी काही तरतूद केली नाही म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा शासन मान्य इतिहास प्रकाशित झाला नाही अशी खंत व्यक्त केलीय. तर जी पुस्तकं प्रकाशित झाली ती नंतरच्या काळात झाल्याचेही ते म्हणालेत. शहाजी महाराजांची समाधीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी करताना, आपण इतिहास विसरलो तर तुमची आमची लायकी आणि ओळख काय? असा सवाल देखील उदयनराजे यांनी केला आहे.

तर राज्यात होणाऱ्या महापुरूषांच्या अपमान आता सहन केला जाणार नसून अशा विकृतीला आळा घालण्यासाठी विशेष अधिवेशन बोलून कायदा परित करावा, अशीही राजकर्त्यांना विनंती असल्याचे त्यांनी म्हटंल आहे. जर असे केलं नाही तर लोक शिवाजी महाराजांवर काहीही बोलण्याचं धाडस करतच राहतील. शिवाजी महारांवरून अवमानाचा कायदा आला तर त्यांची हिंमत होणार नाही, असेही ते म्हणालेत

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale : राहुल सोलापूरकर क्लिन चीट प्रकरण; उदयनराजे संतापले, म्हणाले, "पुण्याच्या पोलिस आयुक्तांचं डोकं..."

सध्या सुरू असणाऱ्याल वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरून उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली असून, वाघ्या कोण? वाघ्या एकच, वाघ होऊन गेला तो म्हणजे शिवाजी महाराज. तसेच त्यांनी राज्यातील अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? असा सवाल करताना मुख्यमंत्री आणि सरकार बोळ्याने दूध पितात का? अवमानबाबत त्यांना कळायला हवं, अशीही थेट टीका केली आहे. तर जे राज्यात राहून औरंगजेबाच स्टेटस ठेवतात ते हलकट आहेत. त्यांना देशाच्या बाहेर पाठवा, असेही रोखठोक भूमीका उदयनराजे भोसले यांनी मांडली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com