

Sudhakar Kohale News : नागपूर पदवीधरमध्ये भाजपला पराभव पत्कारावा लागला. काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. नागपूर म्हणजे भाजप, संघाचा बालेकिल्ला समजला जातो. तेथे झालेल्या पराभवाची दखल वरिष्ठांकडून घेतली गेली आहे. दरम्यान, या निवडणूक पराभवाचे कारण सुधाकर कोहळे यांनीच सांगितले आहे.
ते म्हणाले, 'आमच्याकडे पहिल्या पसंतीची, कोटा पूर्ण करणारी मतं होती. मात्र, दोननंबरच्या पसंतीचे मत जी आमची होती ती 9 हजार मतं अपात्र ठरली. त्याच्यामुळे आम्ही हरलो,असं दिसतंय.'
पुढे बोलताना ते म्हणाले, 'नियोजनामध्ये कुठलीही चूक झाली नाही, कुणाच्या मेहनतीमध्ये चूक झाली नाही. पण कुठेतरी दोननंबर लिहिताना मतदारांच्या हातून चूक झाली असे मला वाटतंय.'
मी पदवीधरांना आवाहन करतो की, 'आपल्या हातून होणार ही चूक ही लोकशाहीची थट्टा आहे. या आपल्या एका मताचा परिणाम आपल्या भागाच्या विकास,विश्वास यावर होतो. मी हात जोडून विनंती करतो की, भविष्यात अशी चूक होऊ देऊ नका.
पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक ७५ हजार ४३८ मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार द्वितीय पसंतीक्रमाची बाद फेरी घेण्यात आली. पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये १ लाख ६५ हजार ९०६ मतांपैकी १५ हजार ३२ मते अवैध ठरली. तर १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरली.
द्वितीय पसंतीच्या बाद फेऱ्यामध्येही कुठल्याही उमेदवाराला निर्धारित कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पहिल्या व द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरी मिळून सर्वाधिक ६७ हजार २३१ मते घेणाऱ्या अभिजित वंजारी यांना विजयी घोषीत करण्यात आले. कोहळे यांना ६३,९६० मते मिळाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.