Lok Sabha Election : विशाल पाटलांनी लढायची हिंमत दाखवली तर वंचितचा पाठिंबा; आंबेडकरांनी पेटवली वात!

Prakash Ambedkar News : आता बघूया, या पाटलांमध्ये हिंमत आहे की नाही? प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य..
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगली लोकसभा जागेवरून राजकीय सुंदोपसुंदी अजूनही संपत नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची तीव्र नाराजी उफाळून आली होती. यासाठी त्यांनी दिल्लीवारी करून हायकमांडकडे आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली होती. आता सांगलीत अजून एक ट्विस्ट आला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी निवडणूक लढवली तर वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देऊन, ताकदीने त्यांच्या बाजूने उभी राहील, असे वंचितने जाहीर केले आहे. यामुळे आता सांगलीत नवा ट्विस्ट आला आहे.

Lok Sabha Election
Prakash Ambedkar News : 'वंचित'ला मतदान करु नका म्हणणाऱ्या तुषार गांधींना आंबेडकरांनी झापलं; म्हणाले...

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटील निवडणुकीत उभे राहणार असतील तर आपण त्यांना पाठिंबा देऊ, असे जाहीर आश्वासन दिले आहे. वंचितने ही मोठी भूमिका घेतली आहे. विशाल पाटील यांना पाठिंबा देऊ आणि त्यांना निवडूनही आणू, असं वक्तव्य आंबेडकर यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election
BJP News : भाजपने स्टार प्रचारक यादीतून शिंदे, पवार यांना वगळले... हे आहे कारण !

बंधूंनी आंबेडकरांची भेट घेतली -

विशाल पाटील (Vishal Patil) यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. प्रकाश आंबेडकरांनी प्रतीक पाटील यांच्याद्वारे विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आंबेडकर आणि प्रतिक पाटील यांची काही दिवसांपूर्वी भेट घडली होती.

Lok Sabha Election
Satara NCP News : संघर्षाच्या काळात शरद पवार गटात 'नाराजीनाट्य'; सुनील माने वेगळी भूमिका घेणार...?

आंबेडकर काय म्हणाले?

चार दिवसांपूर्वी मला प्रतीक पाटील भेटून गेले. मला म्हणाले काय करायचं? मी म्हणालो, हिंमत असेल तर लढा. तुम्ही लढायची हिंमत दाखवली तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. आता बघूया, या पाटलांमध्ये हिंमत आहे की नाही? त्यांनी लढायची हिंमत दाखवली तर पाठिंबा देऊ आणि निवडूनही आणू, अशी ग्वाही देतो, असे आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com