Satara Lok Sabha Election 2024 : कमळाला घड्याळाचे काटे टोचू लागले; 'या' नेत्याच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Political News : महायुतीची उमेदवारी आपल्याला मिळावी, यासाठी खासदार उदयनराजे भोसले, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव अन्य काही जणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता आहे.
Narendra Patil, udynraje, nitin patil
Narendra Patil, udynraje, nitin patil Sarkarnama
Published on
Updated on

Satara News : सातारा लोकसभेची जागा महायुतीमध्ये कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याची उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये ही जागा भाजपला सुटली असल्याचे सांगितले जात असले तरी कोणाचेही नाव अद्याप फायनल झाले नसल्याची चर्चा आहे. महायुतीची उमेदवारी आपल्याला मिळावी, यासाठी खासदार उदयनराजे भोसले, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव अन्य काही जणांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाचा ट्विस्ट अजूनही सुटलेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्यांचा सीटिंग खासदार त्यांचीच ती जागा हे सूत्र मांडले आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला मिळणार की तेथे भाजपकडून (Bjp) खासदार उदयनराजे भोसले (UdyanRaje Bhosle) हे उभे राहणार ? याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. (Satara Lok Sabha Election 2024 )

Narendra Patil, udynraje, nitin patil
Narayan Rane News : राणे अर्ज भरण्यासाठी उतावीळ, शिंदे गट मात्र नाराज, बैठकाही झाल्या रद्द !

राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही जागा त्यांना सुटेल, अशी अपेक्षा आहे. सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे महायुतीकडून मेळावे घेतले जात आहेत. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी उपस्थित राहत नसल्याने घड्याळाचे काटे कमळाला टोचत असल्याची चर्चा जोरात आहे. त्यासोबतच भाजपकडून आपल्याला उमेदवारीची अपेक्षा असल्याचे सांगत नरेंद्र पाटील यांनी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे.

महायुतीच्या कऱ्हाडमधील मेळाव्यात नरेंद्र पाटील यांनी थेट खासदार उदयनराजे भोसले यांच्या समोरच सातारा लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त करून आमचे दिल्लीत कोणीही नाही मात्र आम्ही मुंबईत सागर बंगल्यावर जातो, अशी टिप्पणी करून उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यातच खासदार भोसले यांनी उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग करून सातारा जिल्ह्यात भेटीगाठीवर भर दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उदयनराजे यांनी दिल्लीतून सूत्रे हलवली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड करून महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी सातारा लोकसभेसह चार जागांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू होती. त्यानंतर उदयनराजे यांनी दिल्लीतून सूत्रे हलवली. त्यानंतर हा वाद दिल्ल्लीपर्यंत गेला.

त्यानंतर यावर पर्याय ही महायुतीकडून शोधण्यात आला आहे. भाजपकडून उदयनराजेंच्या उमेदवारीची दिल्लीतून घोषणा होणार असल्याने प्रदेश भाजपकडून दिल्लीकडे बोट दाखवले जात आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला नाही तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा निर्णय होत असताना भाजपने ताणून धरले असल्याने हा तिढा सुटला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे.

R

Narendra Patil, udynraje, nitin patil
Silver Oak Attack : या जन्माच इथेच फेडावं लागतं : छत्रपती उदयनराजेंकडून हल्ल्याचे समर्थन

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com