दम असेल तर एकटं-एकटं येऊन लढा ; दानवेंचे आघाडीच्या नेत्यांना आव्हान

तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर आम्ही धाडी टाकल्या असत्या का,'' असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. ''तुमच्यात दम असेल तर एकट-एकटं येऊन आमच्याशी लढा,'' असे आव्हान रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी महाविकास आघाडी सरकारला (Uddhav Thackeray)दिले आहे.
raosaheb danve
raosaheb danvesarkarnama
Published on
Updated on

देगलूर : भाजपचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत दानवे यांनी आघाडी सरकारवर टीका केली.

''आम्ही धाडी टाकायला लावल्या, असं काँग्रेस ,राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर आम्ही धाडी टाकल्या असत्या का,'' असा सवाल दानवे यांनी यावेळी उपस्थित केला. ''तुमच्यात दम असेल तर एकट-एकटं येऊन आमच्याशी लढा,'' असे आव्हान रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी महाविकास आघाडी सरकारला (Uddhav Thackeray)दिले आहे.

raosaheb danve
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा

रावसाहेब दानवे म्हणाले, ''अडचणीत आलेले साखर कारखाने वाचविण्याचे काम राज्य सरकारचं होते. पण मुख्यमंत्र्यांना भुईमुगाला शेंगा खालून येतात की वरुन हे माहित नाही. मुख्यमंत्र्यांना फक्त उपटून आलेल्या शेंगा माहित आहे.

''एकदा होऊनच जाऊद्या तुमची आमची लढाई लढायला एक - एकटे या,'' असं आव्हान दानवे यांनी आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल आहे. ''पण हे लढायला एकटे येत नाहीत,'' असंही दानवे म्हणाले. भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील अजित पवार यांच्यावर आयटी विभागाने केलेल्या धाडीवरून टीका केली. ''धाडीत ज्याची नावे आहेत, ते काँग्रेस ,राष्ट्रवादी , सेनेचे समर्थक असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com