BJP Politics : देवेंद्र फडणवीसांना इशारा दिल्यानंतर राज ठाकरेंवर भाजपकडून पहिला वार; म्हणाले, 'निवडणुका आल्या की...'

Keshav Upadhyay Raj Thackeray Devendra Fadnavis : मराठी विरूध्द हिंदी हा संघर्षच नाही तरीही राज ठाकरे तो दाखवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत, असा टोला केशव उपाध्याय यांनी लगावला आहे.
Raj Thackeray Devendra Fadnavis
Raj Thackeray Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

BJP VS Raj Thackeray : राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदरच्या सभेत हिंदीच्या सक्तीवरून पुन्हा राज्य सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसरी भाषेची अंमलबजावणी करणार असल्याचे म्हटले होते. त्यावरून राज ठाकरे फडणवीसांवर तुटून पडले. ते म्हणाले, मुख्यमंत्री महाराष्ट्रात मराठी सक्तीसोडून हिंदी सक्तीचे बोलत आहे. तुम्ही हिंदी सक्ती करून तर बघा दुकानच नाही तर शाळा देखील बंद करेल.

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपकडून राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी ट्विट करत 'मराठी विरूध्द हिंदी हा संघर्षच नाही तरीही राज ठाकरे तो दाखवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मराठी भाषा ही महाराष्ट्रात सक्तीची आहेच व हिंदी सक्तीची नाही हे देवेंद्रजींनी स्पष्ट केले आहे.' म्हटले आहे.

'वर्षानुवर्षे मुंबई महापालिका निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी भाषणे नेहमी होतात परंतु राज ठाकरेंसारख्या सारख्या अभ्यासू नेत्यांनेही तीच रिऽऽ ओढावी हे दुर्दैवीच!', असा देखील उपाध्याय यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray Devendra Fadnavis
Shaneshwar Devasthan Trust scam : 'शनैश्वर'च्या घोटाळ्याविषयी मंत्रालयाच्या अहवालात काय? विश्वस्तांना म्हणणे मांडण्याची 'डेटलाईन' निश्चित

उद्धव ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस, भाजपवर टीका केली आहे. त्याला देखील केशव उपाध्याय यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले आहेत की, उद्धवराव आज तुम्ही मुलाखतीत जी टीका टिप्पणी केली ती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात यश मिळाले त्यावेळी निवडणूक आयोगाबद्दल आणि ईव्हीएमबद्दल तुमची तक्रार नव्हती. विधानसभेला अपयश आल्यावर मात्र बॅलट पेपरवर मतदानाची मागणी करू लागलात. विधानसभेला मला जिंकायचंय हा आपल्यात जो मीपणा आला तेव्हा पराभव झाला, असा टोला देखील उपाध्याय यांनी लगावला.

Raj Thackeray Devendra Fadnavis
Rahul Patil: काँग्रेस निष्ठावंतांचे पुत्र हाती घड्याळ बांधणार, करवीरचे राहुल पाटील राष्ट्रवादीत?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com