BJP News: लोकसभेला फटका,'संविधान' 'नॅरेटिव्ह'चा भाजपला अजूनही धसका; पलटवारसाठी आखली नवी रणनीती

BJP Politics : भाजप संविधान बदलणार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वारंवार करत असतात. याकरिता लोकसभेच्या निवडणुकीत मोदी यांनी अबकी चारसो पारचा नारा दिला असल्याचा दावा करण्यात आला होता.
Amit Shah, Rahul Gandhi, Narendra Modi
Amit Shah, Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : लोकसभेच्या निवडणुकीत संविधान बदलणार असल्याच्या काँग्रेसच्या प्रचाराने भाजपला चांगलेच अडचणीत आणले होते. याचा खुलासा करता करता भाजपची चांगलीच दमछाक झाली होती. याचा मोठा फटकाही भाजपला (BJP) निवडणुकीत बसला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी संविधानची प्रत घेऊनच भाषणे देत असून सातत्याने भाजपवर प्रहार करत असतात. याला प्रत्त्युतर देण्यासाठी भाजपच्यावतीने आता आणीबाणीचे हत्यार उपसले जाणार आहे.

भाजपच्यावतीने घरोघरी जाऊन देशात आणीबाणी कोणी लावली, संविधानाची पायमल्ली कोणी केली, त्याचे देशावर काय दुष्परिणाम झाले याची माहिती दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यानिमित्त भाजपच्यावतीने देशभर संघटन पर्व राबवल्या जाणार आहे. ‘

संकल्प ते सिद्धी‘ या माध्यमातून मोदी यांच्या नेतृत्वात अकरा वर्षांचा झालेला विकास, देशाची सुधारलेली आर्थिक परिस्थिती, जगात निर्माण केलेली चवथ्या क्रमांची अर्थव्यव्सथा, पाकिस्तानला दिलेले सडेतोड उत्तर याची माहिती घरोघरी जाऊन नागरिकांना दिली जाणार आहे. याच कार्यक्रमात 25 जून रोजी काळा दिवस म्हणून पाळला जाणार आहे.

याचदिवशी देशात आणीबाणी लावण्यात आली होती. शेकडो समाजसेवकांना जेलमध्ये टाकण्यात आले होते. लोकशाही तुडवण्यात आली होती. यावर सर्वाधिक भर दिला जाणार आहे. या माध्यमातून संविधान अपमान करणारी काँग्रेसच(Congress) आहे असा संदेश घरोघरी पोहचवला जाणार आहे. 25 जून हा काळा दिवस साजरा केला जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या आंदोलनाची रुपरेषा जाहीर करणार आहेत.

भाजप संविधान बदलणार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वारंवार करीत असतात. याकरिता लोकसभेच्या निवडणुकीत मोदी यांनी अबकी चारसो पारचा नारा दिला असल्याचा दावा करण्यात आला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात संविधान याच विषयावर काँग्रेसने आपल्या संपूर्ण फोकस ठेवला होता. अनुसूचित जाती जमाती आणि मुस्लिमांमध्ये अस्वस्था निर्माण करण्यात काँग्रेसला मोठे यश आले होते.

काँग्रेसचा रोख, पुढील राजकीय नीती बघून भाजपने विधानसभेच्या निवडणुकीच हे आरोप खोडून काढण्यासाठी मोठी टीम तयार केली होती. खोटा नॅरिटव्ह तयार केला असल्याचे लोकांपर्यंत पोहवले. त्यानंतर भाजप महायुतीला महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येता आले. मात्र काँग्रेसने अद्याप संविधान विषय सोडलेला नाही. त्यांचा डाव आता आणीबाणीचा विषय घेऊन त्यांच्यावर उलटवण्याची रणनीती आखल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com